TRAI News : एकाच फोनमध्ये २ सिमकार्ड वापरताय? भरावा लागू शकतो दंड; वाचा TRAI चा प्रस्ताव

Phone 2 SIM Card News : अनेक ठिकाणी दोन सिम वापरून व्यक्ती नंबर्सचा गैरवापर करत आहेत. हा गैरप्रकार रोखण्यासाठी TRAI कडून असे सिम वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
Phone 2 SIM Card News
TRAI NewsSaam TV

एकाच स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्या व्यक्तींच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण सरकारमार्फत अशा पद्धतीने सिम वापरणाऱ्या व्यक्तींवर दंड आकारण्यासाठी प्लान केला जात आहे. ईटीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, TRAI ने आपल्या एका प्रस्तावात अशी माहिती दिलीये.

Phone 2 SIM Card News
RBI Penalty On Banks: आरबीआयचा ३ मोठ्या बँकाना धक्का; तब्बल 10 कोटींचा दंड

अनेक ठिकाणी दोन सिम वापरून व्यक्ती नंबर्सचा गैरवापर करत आहेत. हा गैरप्रकार रोखण्यासाठी TRAI कडून असे सिम वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्या दृष्टीने TRAI यावर विचार करत आहे.

TRAI च्या म्हणण्यानुसार, आज प्रत्येकाकडे २ स्मार्ट फोन आहेत, तसेच २ सिम कार्ड देखील आहेत. मोबाईल क्रमांक ही सरकारची संपत्ती आहे. ठरावीक मर्यादा देऊन ही संपत्ती दूरसंचार कंपन्यांना देण्यात आलीये. त्यामुळे क्रमांकासठी प्रत्येक सिम मागे सरकार ठरावीक शुल्क देखील वसून करू शकते.

आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे दोन सिम कार्ड आहे. यातील एक सिम ते पूर्ण वापरतात आणि दुसरं सिम फक्त रिचार्ज करून सुरू ठेवतात. टेलिकॉम कंपन्या आपले ग्राहक कमी होऊ नयेत म्हणून सिम बंद देखील करत नाहीत. प्रत्येक सिमकार्डसाठी शुल्क आकारले पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्षी ठरावीक शुल्क द्यावे लागेल, असंही TRAI ने आपल्या ईटीला दिलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे.

Phone 2 SIM Card News
RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँकेची ५ सहकारी बँकांवर मोठी कारवाई; ठोठावला लाखोंचा दंड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com