सध्या मोबाईलचा रिचार्ज करणे खूप जास्त महागले आहे. रिचार्जमध्ये तुम्हाला इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंगच सुविधा मिळते. परंतु सध्या रिचार्ज एवढे महाग झाले आहेत की सर्वसामन्यांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळेच रिलायन्सने जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज लाँच केला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि डेटाचा फायदा मिळणार आहे. (Jio Recharge)
रिलायन्सने सर्वाधिक जास्त कालासाठी असलेला रिचार्ज प्लान आहे. यामध्ये तुम्हाला ३३६ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा होणार आहे.
जिओच्या या प्लानची किंमत १७४८ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची वैधता मिळणार आहे. हा एक वॉइस ओनाली प्लान आहे. हा प्लान फक्त कॉलिंगसाठी आहे. यामध्ये तुम्हाला डेटा मिळणार नाही. या प्लानमध्ये तुम्हाला ३६०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते.
या प्लानसोबत JioTV आणि Jio AI Cloudचं मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यामध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. तुम्हाला इंटरनेटची गरज भासत नाही.
याचसोबत जिओचा आणखी एक ४४८ रुपयांचा प्लान आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी कालावधीसाठी आहे. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला १००० एसएमएस करायची सुविधा मिळते.यातदेखील तुम्हाला JioTV आणि Jio AI Cloudचं मोफत सबस्क्रिप्शन मिळालं होतं.
वोडाफोन-आयडिया (VI Recharge Plan)
वोडाफोन आयडियाचा एका वर्षासाठी ३४९९ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये युजर्सांना दर दिवशी 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. तसेच रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड नाइट डेटा मिळतो.
एअरटेलचा प्लान (Airtel Recharge Plan)
एअरटेलचा ४००० रुपयांचा रिचार्ज प्लान खास विदेश यात्रेसाठी असणार आहे. यामध्ये 5GB इंटरनॅशनल डेटा, १०० मिनिट इंटरनॅशनल कॉलिंग आणि एअरलाइन्समध्ये 250MB इन-फ्लाइट डेटा मिळतो. हे ई- सिम सरळ एअरपोर्टवर व्हेरिफिकेशन करताना अॅक्टिव्हेट होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.