भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Gold Prices Surge in Jalgaon: जळगावच्या सुवर्णनगरीत २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात १००० रूपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी १,२७,००० रूपये मोजावे लागतील.
Gold Prices Surge in Jalgaon
Gold Prices Surge in JalgaonSaam
Published On
Summary
  • सुवर्णनगरीत सोन्याला चकाकी

  • चांदीच्या दरात घसरण

  • १ तोळं सोन्याचा भाव किती?

  • पाहा लेटेस्ट दर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या दरात कमालीची घट झाली. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, आज सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

आज २३ ऑक्टोबर २०२५. जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे. तर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात १००० रूपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी आपल्याला १,२७,००० रूपये मोजावे लागतील.

Gold Prices Surge in Jalgaon
महापौराचं काय आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचाय, भाई जगतापांच्या स्वबळाच्या दाव्यावर संजय राऊत भडकले

सोन्याच्या दरात तेजी तर, चांदीच्या दरात घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात ७००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,६२,७४० रूपये मोजावे लागतील.

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सुवर्णगिरीत नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरांमध्ये सतत होणाऱ्या चढ-उतारांनंतरही उत्सवी वातावरणामुळे लोकांमध्ये सोने-चांदी खरेदीची उत्सुकता कायम आहे.गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने आणि गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत असल्याने दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Gold Prices Surge in Jalgaon
'ना मोहोळांवर - ना भाजपवर माझा राग, पण...'; केंद्रीय मंत्र्यांविरोधात रान उठवणारे रवींद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?

चांदीच्या दरातील घसरण मात्र औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील पारंपरिक दृष्ट्या शुभ मानली जाणारी भाऊबीज आणि त्यानंतरचा लग्नसराईचा हंगाम यामुळे स्थानिक बाजारपेठेत व्यवहार वाढलेले दिसत आहेत.

“दरांमध्ये चढ-उतार असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. लोक सणासुदीच्या निमित्ताने दागदागिने आणि नाणी खरेदी करत आहेत. एकंदरीत, दरातील वाढ-घसरणीच्या पार्श्वभूमीवरही जळगावच्या सुवर्णगिरीत भाऊबीज सणाने सुवर्णमय वातावरण निर्माण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com