Train Ticket: IRCTC ची भन्नाट सेवा, तिकीट कन्फर्म होईपर्यंत बुकिंग 'फ्री'!

IRCTC Online Booking: IRCTC वरून ऑनलाईन तिकीट बुक करताना आपल्याला अनेक फायदे मिळतात. तिकीट कन्फर्म होईपर्यंत आपल्याला बुकिंग 'फ्री' मिळते.
Train
TrainYandex
Published On

IRCTC Train Ticket Refund

जर तुम्ही IRCTC वरून ऑनलाईन तिकीट बुक करत असाल, तर तुम्हाला या खास सेवेबद्दल माहिती असायला हवी. या सेवेच्या मदतीने तुम्ही तुमचे तिकीट IRCTC साइटवर 'फ्री' बुकींग करू शकता. जेव्हा तुम्हाला कन्फर्म तिकीट होईल, तेव्हाच तुम्हाला पैसे द्यावे लागतील. जर तुम्हाला कन्फर्म केलेल्या तिकीटऐवजी वेटिंग तिकीट मिळालं आणि ते रद्द झाले, तर तुम्हाला त्वरित परतावा (IRCTC Train Ticket Refund) मिळेल. (marathi news)

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) चे स्वतःचे पेमेंट गेटवे i-Pay आहे. या पेमेंट गेटवेद्वारे IRCTC वर पेमेंट केले तर तुम्ही 'ऑटोपे' फीचर वापरू शकता. क्रेडिट-डेबिट कार्ड आणि UPI द्वारे ऑटो-पे फीचर देखील वापरू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

IRCTC ऑटोपे कसं कार्य करते

IRCTC वेबसाइटनुसार, जेव्हा सिस्टम रेल्वे तिकिटासाठी PNR नंबर जनरेट करते, तेव्हाच त्याच्या खात्यातून पैसे कापले जातात. परंतु ऑटो-पे सुविधा UPI द्वारे IPO मध्ये गुंतवणूक करण्यासारखे कार्य करते. म्हणजेच IPO मध्ये शेअर्सचे वाटप होईपर्यंत तुमच्या खात्यातून पैसे कापले जात नाहीत. i-Pay Autopay चा लाभ मोठ्या रकमेसाठी रेल्वे ई-तिकीट बुक करतात, अशा लोकांना मिळतो. फर्स्ट एसी कोचची 4 किंवा 5 तिकिटे एकत्रितपणे बुक करणाऱ्यांना हा फायदा मिळतो.

आय-पे ऑटोपेमध्ये तिकीट बुक (Train Ticket) करताना, तुमच्या खात्यातून पैसे कापले जात नाहीत, उलट तिकिटाच्या रकमेइतकी रक्कम ब्लॉक केली जाते. अशा रिस्थितीत तिकीट कन्फर्म झाले तरच पैसे कापले जातात, अन्यथा त्वरित परतावा दिला (IRCTC Online Booking) जातो. अशा प्रकारे रक्कम 'ब्लॉक' ठेवण्याला 'धारणााधिकार' असे म्हणतात. तर साधारणपणे हे पैसे लोकांच्या खात्यात 3 ते 4 दिवसांनी येतात.

Train
Google Flight Ticket : स्वस्तात मस्त फ्लाइटने प्रवास करायचाय? गुगल करणार मदत; कशी कराल बुकिंग, जाणून घ्या संपूर्ण माहिती
  • सामान्य कालावधीत त्वरित तिकीट बुक करतात किंवा प्रतीक्षा यादीत असतात, अशा लोकांसाठी i-Pay Autopay फायदेशीर आहे.

  • जेव्हा सामान्य किंवा तत्काळ श्रेणीतील एखादी व्यक्ती प्रतीक्षा तिकीट चार्ट तयार झाल्यानंतरही प्रतीक्षा करत असेल, तेव्हा त्याला ऑटो-पेद्वारे त्वरित परतावा (Train Ticket Refund) मिळतो.

  • त्यावेळी त्याला IRCTC सुविधा शुल्क, रद्दीकरण शुल्क आणि इतर आवश्यक शुल्क त्याच्या धारणाधिकाराच्या रकमेतून भरावे लागतात.

  • जेव्हाही तुम्ही तिकीट बुक करता तेव्हा वेटिंग लिस्टच्या पेमेंटसाठी iPay पर्याय निवडून, या सुविधेचा लाभ घेता येतो.

Train
#Shorts : Cashless ST Tickets | एसटीचं तिकीट कॅशलेस होणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com