IRCTC वरुन तिकीट बुक करताय? हे क्रेडिट कार्ड ठरतील बेस्ट, पाहा लिस्ट

Which Credit Card is benefits for IRCTC Ticket : तिकीट बुक करण्यासाठी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डवर विविध फायदे देतात. त्याचप्रमाणे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे रेल्वे तिकीट बुक केल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळतील.
IRCTC Ticket Booking
IRCTC Ticket Booking Saam Tv
Published On

IRCTC Ticket Booking Processs :

डिसेंबर महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात ते फिरण्याचे. या काळात बरेच लोक फिरण्यासाठी जातात. आपल्यापैकी अनेक लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश लोक IRCTC च्या वेबसाइटवरुन तिकीट बुक करतात.

परंतु तिकीट बुक करण्यासाठी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डवर विविध फायदे देतात. त्याचप्रमाणे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे रेल्वे तिकीट बुक केल्यास तुम्हाला अधिक फायदे मिळतील. तसेच यामध्ये तुम्हाला कॅशबॅक, रिवॉर्ड्सचे देखील फायदे कार्डवर मिळतील. कोणत्या क्रेडिट कार्डवरुन फायदा होईल जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. एचडीएफसी बँक

IRCTC HDFC बँक क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ देते. या कार्डच्या मदतीने तुम्ही तिकीट बुकिंग वेबसाइट किंवा रेल्वे कनेक्ट अॅपवर खर्च केल्यास, तुम्हाला १०० रुपयांवर ५ रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. तसेच ५ टक्के कॅशबॅक आणि १ टक्के सूटही मिळत आहे. या कार्डसाठी तुम्हाला वर्षाला ५०० रुपये भरावे लागतील. जर तुम्हाला १,५०,००० पेक्षा जास्त खर्च केल्यास शुल्क माफ केले जाते.

IRCTC Ticket Booking
Gold Silver Rate (2nd December 2023 ): लग्नसराईत सोनं सर्वसामान्याच्या अवाक्या बाहेर? गाठली उच्चांकाची पातळी, मुंबई-पुण्यात आजचे दर किती?

2. स्टेट बँक ऑफ इंडिया

IRCTC SBI प्लॅटिनम कार्डवर ३५० बोनस रिवॉर्ड पॉइंट मिळतात. जर तुम्ही irctc.co.in किंवा IRCTC मोबाईल अॅपद्वारे तिकीट बुक केल्यास रिवॉर्ड पॉइंट्स म्हणून १० टक्के मिळतील. याशिवाय तुम्हाला या कार्डचा फायदा (Benefits) विमानाच्या तिकीट बुकिंगवरही होईल. या कार्डमध्ये तुम्हाला रेल्वे लाउंजमध्येही प्रवेश मिळेल. IRCTC SBI कार्ड प्रीमियरसुद्धा प्रति रु. 125 खर्च केलेल्या 3 रिवॉर्ड पॉइंट देते. या कार्डवर रेल्वे लाउंजमध्ये प्रवेश मिळतो. या कार्डचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वर्षभरासाठी 1,499 रुपये अधिक GST भरावा लागेल.

3. बँक ऑफ बडोदा

IRCTC BoB RuPay क्रेडिट कार्डवरवरुन तुम्ही तिकीट बुक केल्यास १०० रुपयांवर ४० टक्के रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. या कार्डसाठी तुम्हाला ३५० रुपये (Price) वर्षभरात भरावे लागतील. या कार्डमध्ये तुम्हाला रु. 1,000 बोनसचा लाभ मिळू शकतो.

IRCTC Ticket Booking
UPI Transaction द्वारे चुकीच्या अकाऊंटला पैसे गेल्यास टेन्शन घेऊ नका, 4 तासात पैसे परत मिळणार?

4. कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना कोटक रॉयल सिग्नेचर क्रेडिट कार्डवर रेल्वे तिकीट बुकिंगवर सूट मिळते आहे. या कार्डवर तुम्हाला १ रुपयावर ४ रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. तसेच यासाठी तुम्हाला वर्षभरात ९९९ रुपये भरावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com