
अॅपलने आपल्या यूजर्सच्या प्रायव्हसीचा नेहमीच अभिमान बाळगला आहे. परंतु नव्या iOS 26 अपडेटमुळे अनेक आयफोन यूजर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या अपडेटपासून अॅपलने “भेट दिलेली ठिकाणे” हे वैशिष्ट्य आणले आहे. जे यूजर्सच्या हालचालींचा मागोवा ठेवते. खास बाब म्हणजे हे फीचर फोनमध्ये डीफॉल्टनुसार सक्षम असते. म्हणजेच तुम्ही काही बदल न केल्यास तुमच्या प्रत्येक भेटींची नोंद आपोआप घेतली जाते. या माध्यमातून iPhone तुमच्या हालचालींचा, भेट दिलेल्या ठिकाणांचा आणि थांबण्याच्या कालावधीचा ट्रॅक ठेवतो.
अॅपलच्या मते, ही सर्व माहिती एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असून केवळ तुमच्या डिव्हाइसवर सुरक्षितरीत्या साठवली जाते. मात्र, ट्रॅकिंगसारख्या क्रियाकलापांमुळे काही यूजर्समध्ये प्रायव्हसीबाबत संशय निर्माण झाला आहे. अनेकांना असे वाटते की, कंपनी त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे लोकेशन डेटा गोळा करत आहे. त्यामुळे यूजर्सच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. अॅपल खरंच आपल्या डेटा गोपनीयतेचा सन्मान राखत आहे का?
जर तुम्हालाही याची काळजी वाटत असेल, तर ही वैशिष्ट्ये पूर्णपणे बंद करता येतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या ‘Settings’ मध्ये जाऊन ‘Privacy & Security’ या विभागात ‘Location Services’ निवडा. त्यानंतर ‘System Services’ उघडा आणि ‘Significant Locations’ हा पर्याय शोधा. येथे तुम्ही हे फीचर पूर्णपणे निष्क्रिय करू शकता तसेच आधीचा डेटा देखील क्लिन करू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या हालचालींचा पूर्ण कंट्रोल स्वतःकडे ठेवू शकता आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवू शकता.
अॅपलने जरी यूजर्सना खात्री दिली असली की ही नोंद कोणत्याही बाहेरील सर्व्हरवर साठवली जात नाही, तरी प्रायव्हसीबाबत सतर्क राहणे नेहमीच शहाणपणाचे ठरते. कारण डिजिटल युगात सुरक्षेचा आणि डेटा संरक्षेचा प्रश्न पूर्वीपेक्षा अधिक गंभीर बनला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.