Gilt Funds:गिल्ट नाही तर देणार चिक्कार पैसा; काय आहे Gilt फंड, का वाढतेय गुंतवणूक

Gilt Funds: या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला गिल्ट नाही तर जबर मोबदला मिळेल.
Gilt Funds
Gilt FundsSaam Tv
Published On

What is Gilt Funds:

गुंतवणूक करताना आपण कमी जोखीमेच्या योजना कोणत्या आहेत याची माहिती घेत असतो. जेथे कमी जोखीम असेल तेथे आपण सर्वजण गुंतवणूक करत असतात. यामुळे इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी गुंतवणूकदार मुदत ठेवी इतर सुरक्षित योजनेत पैसे गुंतवतात. पण या गुंतवणुकीत कमी व्याज मिळत असते. (Latest News)

बहुतेक बँका एफडीवर वर्षाला ६.५ टक्के ते ७ टक्के व्याज देत असतात. हे व्याजदर खूप कमी आहे. यामुळे ज्या लोकांनी बँकेच्या एफडीवर गुंतवणूक केली असेल त्यांना अधिक मोबदला मिळत नाही. जर तुम्हाला कमी जोखीमसह मोठा मोबदला हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कमी जोखीममध्ये अधिक मोबदला हवा असेल तर तुम्ही गिल्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. या फंडमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला गिल्ट नाही तर जबर मोबदला मिळेल.

काय आहे गिल्ट फंड

गिल्ट फंड हे एक डेट म्युच्युअल फंडचं योजना आहे. ही योजना केंद्र आणि राज्य सरकारद्वारे वेगवेगळ्या मॅच्युरिटी काळासाठी गव्हर्नमेंट सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करते. याचाच अर्थ फंडमध्ये कोणतेची जोखीम नाही. तसेच एफडीसारखं यातून आपल्याला मोठा मोबदला मिळत असतो. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गिल्ट फंडांना ८० टक्के भाग गव्हर्नमेंट सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूक करावी लागते. परंतु यात व्याजदारावर एक जोखीम आहे.

दरम्यान गुंतवणूकदार परत एकदा गिल्ट फंडाकडे वळत आहेत. मागील एका वर्षाच्या रिटर्नवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, रिटर्न ८ ते ९ टक्के झालं आहे. व्याजदर वाढलेली असून ते अजून वाढणार असल्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदार या फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. गिल्ट फंड हे सेंसिटिव स्कीम आहे. म्हणजेच जर व्याजदरे कमी झाले तर या फंडामधील रिटर्नमध्ये वाढ होत असते. तर व्याजदारे वाढली तर यातून मिळणारा रिटर्न हा कमी होत असतो. गिल्ट फंडांचे परतावे म्हणजेच रिटर्न थेट सरकारी उत्पन्नातील घसरणीशी जोडलेले असतात. दहा वर्षाच्या सरकारी बॉन्डच्या बेंचमार्क उत्पनात घट झाली तर दीर्घ काळाच्या बॉन्डची व्हॅल्यू वाढत जाते.

एका वर्षातील सर्वात टॉप रिटर्नवाले गिल्ट

  • ICICI Pru Gilt Fund 8.30%

  • SBI Magnum Gilt Fund: 7.82%

  • LIC MF Nifty 8-13 yrs G-Sec LT Gilt: 7.75%

  • Baroda BNP Pribas Gilt Fund: 7.64%

  • Kotak Gilt Fund: 7.50%

५ वर्षात टॉप रिटर्नवाले गिल्ट फंड

  • SBI Magnum Gilt Fund: 8.71%

  • DSP Govt Securities: 8.69%

  • ICICI Pru Gilt Fund 8.51%

  • Bandhan GSF Investment: 8.49%

  • Kotak Gilt Fund: 8.47%

Gilt Funds
SIP Investment Mantra: करोडपती होण्यासाठी महिन्याला करा ५ हजारांची बचत; छोटीशी गुंतवणूक बदलून टाकेल नशीब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com