SIP Investment Mantra: करोडपती होण्यासाठी महिन्याला करा ५ हजारांची बचत; छोटीशी गुंतवणूक बदलून टाकेल नशीब

SIP Investment : भविष्यात तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर SIP च्या माध्यमातून बचत करून तुम्ही करोडपती व्हाऊ शकतात.
SIP Investment
SIP Investment Saam Tv
Published On

SIP Investment Mantra:

आपल्यामधील कोणालाही विचारलं की तुला करोडपती व्हायला आवडेल का? आपल्या सर्वांचे उत्तर हो, हेच असेल. मग करोडपती कसं होणार असा प्रश्न परत कोणी केला तर आपल्यालाकडे मात्र त्याचे उत्तर कदाचित नसेल? पण या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपं आहे आणि ते उत्तर आम्ही तुम्हाला देतो, आपल्यातील सर्वजण श्रीमंत होतील. यासाठी तुम्हाला फक्त महिन्याकाठी काही पैशाची बचत करावी लागेल. (Latest News)

भविष्यात तुम्हाला करोडपती बनायचे असेल तर SIP च्या माध्यमातून बचत करून तुम्ही करोडपती व्हाऊ शकतात. यात गुंतवणूक कारायची असेल तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीद्वारे करावी लागते. बहुतेक तज्ज्ञ एसआयपीला आजच्या काळातील गुंतवणुकीचे सर्वोत्तम साधन मानतात.

SIP मध्ये जितके जास्त पैसे गुंतवाल तितके चांगले परतावे मिळतील. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या गुंतणुकीकडे अनेकांचा कल वाढला आहे. एसआयपीची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची गुंतवणूक कधीही वाढवू किंवा कमी करू शकता. तसेच तुम्ही गुंतवलेले पैसे दीर्घकाळात वेगाने वाढतात. SIPचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. हा परतावा आजच्या कोणत्याही योजनेपेक्षा खूप जास्त आहे.

अशी करावी गुंतवणूक

५ हजार रुपये गुंतवून करोडपती होण्यासाठी किती वर्षे लागतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याचं उत्तर पुढे आहे. आजपासून तुम्ही ५ हजारांची SIP सुरू केली. ही एसआयपी तुम्हाला २६ वर्षापर्यंत ती सतत सुरू ठेवावी लागेल. तर तुम्हाला १२ टक्के रिटर्ननुसार २६ वर्षांत १,०७,५५,५६० रुपये मिळतील. तर ५ हजार रुपये दरमहा दराने तुमची एकूण गुंतवणूक १५,६०,००० रुपये होईल.

जर तुम्ही गुंतवणुकीची रक्कम थोडी वाढवून ८ हजार रुपये केली. तर करोडपती होण्यासाठी तुम्हाला किमान २२ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. २२ वर्षांत तुम्ही एकूण २१,१२,००० रुपयांची गुंतवणूक कराल. व्याजाच्या १२ टक्क्याच्या रिटर्ननुसार तुम्हाला १,०३,६७,१६७ रुपये मिळतील. जर तुम्ही दरमहा १० हजार रुपये गुंतवू शकत असाल.

तर तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकता. तुम्हाला २० वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही या २० वर्षांत २४,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला १२ टक्के परतावा म्हणून ९९,९१,४७९ रुपये (सुमारे १ कोटी रुपये) मिळतील. जर तुम्ही ते २१ वर्षे चालू ठेवले तर परतावा म्हणून १,१३,८६,७४२ रुपये मिळू शकतात.

SIP Investment
Car Loan Tips: सणांच्या हंगामात कार खरेदी करायची आहे? कोणती बँक स्वस्त दराने देते कर्ज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com