Investment Tips: श्रीमंत होण्याचा जबरदस्त मार्ग; वयाच्या ४० व्या वर्षी व्हाल करोडपती; काय आहे 15x15x15 फॉर्म्युला? जाणून घ्या

Investment Tips 15x15x15 Formula: सर्वांनाच लहान वयात श्रीमंत व्हायचे असते. श्रीमंत होण्यासाठी कमावलेल्या पैशांची गुंतवणूक करायला हवी. जर तुम्हाला चांगला परतावा मिळाला तर तुम्ही लहान वयात करोडपती होऊ शकतात.
Investment Tips
Investment TipsSaam Tv
Published On

प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असते. त्यासाठी प्रत्येकजण खूप मेहनत करतात आणि पैसे कमावतात. याच पैशांची गुंतवणूक करुन तुम्ही तुमचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करु शकतात. आज आम्ही तुम्हाला पैसे गुंतवणूक करायची अशी पद्धत सांगणार आहोत. यामुळे तुम्ही अवघ्या ४० व्या वर्षी करोडपती होऊ शकतात.

पैशानेच कमावता येतात, असे अनेकजण म्हणतात. त्यात तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करु शकतात. शेअर मार्केटमध्येदेखील गुंतवणूक केल्याने तुम्ही पैसे कमवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा गुंतवणूकीबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही करोडपती होऊ शकतात. SIP मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्ही खूप कमी वयात जास्त पैसे कमवू शकतात.

Investment Tips
ITR Filing Deadline: कोणते करदाते अंतिम मुदतीनंतरही इन्कम टॅक्स रिटर्न्स भरू शकतील?

सध्या अनेक लोक म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करतात. यामध्ये १२ ते १५ टक्के परतावा मिळतो. तसेच चक्रवाढ व्याजदेखील मिळते. त्यामुळे एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे वाढतात.

SIP चा 15X15X15 फॉर्म्युला काय आहे?

SIP च्या 15X15X15 फॉर्म्युलानुसार, तुम्हाला १५ वर्षांसाठी दर महिन्याला १५,००० रुपये गुंतवायचे आहेत. ज्यामध्ये तुम्हाला १५ टक्के दराने व्याज मिळू शकते. याचाच अर्थ तुम्ही जर १५ वर्षांमध्ये दर महिन्याला १५००० रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही २७,००,००० रुपयांची गुंतवणूक करत आहे. यावर १५ टक्के व्याज म्हणजेच तुम्हाला ७४,५२,९४६ रुपये मिळतील. त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याज पकडून तुम्हाला १५ वर्षात १,०१,५२,९४६ रुपये मिळतात. जर तुम्हाला एसआयपीवर १२ टक्के व्याज मिळाले तर तुम्हाला करोडपती होण्यासाठी १७ वर्ष लागतील.

Investment Tips
Lakhpati Didi Scheme: महिलांना व्यवसायासाठी मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

म्युच्युअल फंड हा मार्केटशी जोडलेला आहे. त्यामुळे एसआयपीमध्ये ठरावीक परताव्याची हमी देत नाही. हा परतावा मार्केटवर अवलंबून असतो. त्यामुळे यात गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या.

एसआयपीमध्ये तुम्ही दोन पद्धतीने गुंतवणूक करु शकतात. एक म्हणजे डायरेक्ट प्लान आणि दुसरं म्हणजे रेगुलर प्लान. यामध्ये तुम्ही एकदम पैसे गुंतवणूक करु शकतात. तर रेगुलर प्लानमध्ये प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करु शकतात.

Investment Tips
Mukhyamantri Annapurna Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना मिळणार 3 मोफत सिलिंडर; काय आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अटी, जाणून घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com