Inspirational Story: कौतुकास्पद! आर्मी ऑफिसरच्या मुलाने सैनिकांसाठी बनवला 'फिनिक्स फूट'; वाचा गुरुविंदर सिंग यांची स्टोरी

Inspirational Story: गुरविंदर सिंग यांनी लष्करातील जवानांसाठी फिनिक्स फूट बनवला आहे. यामुळे दिव्यांग जवानांना स्वतः च्या पायावर उभं राहता येणार आहे.
Inspirational Story
Inspirational StorySaam Tv
Published On

देशाची सेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. भारत देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे आपले सैनिक. देशाच्या सीमेवर दिवसरात्र लक्ष ठेवून शत्रूंना चोख उत्तर देणाऱ्या सैनिकांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षित राहतो. परंतु या सैनिकांना ऊन, पाऊस, थंडी काहीही न बघता सतत काम करावे लागते. कधी युद्धात त्यांना जीव गमवावा लागतो तर अनेकदा अपंगत्वदेखील येते. असंच अंपगत्व एक लष्करी कर्मचाऱ्याला आले होते. त्यांनी आपला पाय गमावला होता. त्यामुळेच लष्करातील एका अधिकाऱ्याच्या मुलाने चक्क 'फिनिक्स फूट' (Pheonix Foot) तयार केला आहे.

Inspirational Story
Success Story: ३० लाखांची नोकरी सोडली अन् UPSC क्रॅक केली, AI इंजिनियर ते IFS ऑफिसर अंकन बोहरा यांचा प्रेरणादायी प्रवास

अनेकदा आर्मीचे जवान युद्धात आपले हात-पाय गमावतात. परंतु त्यांना त्यानंतर चांगले आयुष्य जगता यावे, यासाठी फिनिक्स फूट तयार करण्यात आला आहे. ४१ वर्ष गुरविंदर सिंग यांनी हे डिझाइन विकसित केले आहे. त्यांनी पुण्यातील आर्टिफिशियल लॅब सेंटर (ALC)येथील डॉक्टर आणि तज्ञांच्या मदतीने हा फिनिक्स फूट तयार केला आहे. (Inspirational Story Of Army Officer Son)

गुरुविंदर सिंग (Gurvinder Singh) यांचे वडील लेफ्टनंट म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी युद्धात आपला पाय गमावला होता. त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी मी मदत करेन, असं गुरविंदर यांनी सांगितलं होते. त्यांचे अंतिम विधी करत असताना त्यांचा मुलगा गुरविंदर सिंग यांच्या मनात हाच विचार आला. त्यानंतर त्यांनी त्यांनी अभ्यास सुरु केला. पीव्हीसी पाईप्ससह काही सामानांपासून त्यांनी पहिला एक स्टंप तयार केला.क्रॅचच्या मदतीने त्यांचे वडील उभे राहू शकत होते.परंतु ती फक्त सुरुवात होती. आता गुविंदर सिंग यांनी ही कल्पना सत्यात उतरवली आहे. त्यांनी लाखो सैनिकांने आयुष्य सुखकर बनवण्यासाठी फिनिक्स फूट तयार केला आहे.

Inspirational Story
Success Story: AIIMS मधून MBBS, नंतर UPSC केली क्रॅक; IAS ची नोकरी सोडून उभारली २६००० कोटींची कंपनी; रोमन सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

ALC टीमने भारतीय लष्कराच्या वार्षिक आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धा, इनो योद्धमध्ये फिनिक्स फूट सादर केले होते. याचा समारोप गेल्या आठवड्यात झाला. यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी गुरविंदरला मेडल प्रधान केले.आतापर्यंत ALC च्या ५ पेक्षा जास्त सैनिकांनी या फिनिक्स फूटचा वापर केला आहे. (Inspirational Story)

Inspirational Story
Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, RBI नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक, IAS अनन्या दास यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com