Railway Rule: रेल्वेचा नवीन नियम! तात्काळ तिकीट बुक करण्याची वेळ बदलली

Tatkal Ticket BookinG Rule Change: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तात्काळ तिकीट बुक करण्याची वेळ आता बदलण्यात आली आहे.
Railway Rule
Railway Saam Tv
Published On

भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन नियमांमुळे तात्काळ तिकीटाची बुकिंग अधिक सोपी होणार आहे. (Railway Rule Change)

रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, एसी क्लाससाठी बुकिंग सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे. तर नॉन एसी डब्ब्यांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग ११ वाजल्यापासून सुरु होणार आहे. ज्या प्रवाशांना आप्तकालीन परिस्थितीत तिकीट बुक करायचे आहे त्यांना हे फायदेशीर ठरणार आहे. (Railway Change Tatkal ticket Booking Timing)

Railway Rule
Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

तात्काळ तिकीट बुक करण्याची प्रोसेस (How To Book Tatkal Ticket)

तात्काळ तिकीट तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवरुन बुक करु शकतात.

या वेबसाइटवर सर्वप्रथम रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर प्लान माय जर्नी या सेक्शनमध्ये जावे लागणार आहे.

यानंतर तुमच्या प्रवासाची तारीख, रेल्वे स्टेशन याबाबत माहिती द्यायची आहे.

Railway Rule
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार; कशी असणार प्रक्रिया? वाचा एका क्लिकवर

त्यानंतर बुकिंग करताना तात्काळ हा ऑप्शन निवडा. तुम्ही एसी किंवा नॉन एसी हा पर्याय निवडून तिकीट बुक करायचे आहे.

यानंतर तुमची सर्व माहिती, नाव, ओळखपत्र याबाबत माहिती द्या. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तिकीटाचे पैसे भरायचे आहे.

हे तिकीट तुम्हाला ई-मेलवर पाठवण्यात येईल. तात्काळ तिकीटावर तुम्हाला कोणतेहे रिफंड मिळणार नाही.

याच पद्धतीने तुम्ही कन्फर्म तिकीटदेखील बुक करु शकतात. फक्त तुम्हाला तात्काळऐवजी कन्फर्म तिकीट हा ऑप्शन निवडायचा आहे. कन्फर्म तिकीट असल्यावर तुम्हाला ट्रेनमध्ये आरक्षित जागा मिळते. परंतु जर तुमच्या

आजकाल कोणाचेही फिरायला जाणे किंवा कामासाठी बाहेर जाणे हे ठरलेले नसते. अनेकदा कामासाठी तुम्हाला कधीही तिकीट काढावे लागू शकते. त्यामुळे आप्तकालीन परिस्थितीत सहज आणि सोप्या पद्धतीने तिकीट बुक करता यावे, म्हणून रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. (Railway Ticket Booking process)

Railway Rule
LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com