Indian Railway: रेल्वेचे आजपासून नवीन नियम लागू; ट्रेन तिकीट बुकिंग वेळ, वेटिंग तिकीटाच्या निमयात मोठा बदल

Indian Railway New Rule: भारतीय रेल्वेने अलीकडेच ट्रेन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
Indian Railway
Indian Railway New RuleSaam Tv
Published On

रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बुकिंग प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी हे बदल करण्यात आलेत. शनिवार 1 मार्च 2025 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांचा उद्देश प्रवाशांना उत्तम सेवा प्रदान करणे असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आलीय.

Indian Railway
Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये रील शूट करत होती, आईने पाहिलं अन् पुढे जे झालं ते पाहून तुम्ही म्हणाल..

भारतीय रेल्वेने Advance Reservation Period (ARP) 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केलाय. तसेच, वेटिंग तिकीट, Tatkal तिकीट बुकिंग आणि रिफंड पॉलिसीमध्येही बदल करण्यात आले आहेत.

हे आहेत नवीन नियम

(Advance Reservation Period) आरक्षण कालावधी- 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केलाय.

वेटिंग तिकीट सिस्टम -वेटिंग तिकीट आता फक्त जनरल डब्यात मान्य असणार आहे.

तात्काळ (Tatkal) तिकीट बुकिंग वेळ AC क्लास: सकाळी 10 वाजता, Non-AC क्लास: सकाळी 11 वाजता करता येणार आहे.

Indian Railway
Vaishno devi tourism : खुशखबर! वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणं झालं सोप्पं; मुंबईसह या शहरातून धावणार स्पेशल ट्रेन

रिफंड पॉलिसी- ट्रेन रद्द होणे किंवा 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास रिफंड मिळेल.

AI तंत्रज्ञानाचा वापर- सीट वाटप प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी AI चा वापर केला जाईल.

परदेशी पर्यटकांसाठी ARP- 365 दिवस आधी बुकिंगची सुविधा दिली जाणार आहे.

हे बदल प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचा प्लान अधिक चांगला करता यावा यासाठी आणि “नो-शो” समस्या कमी करण्यासाठी करण्यात आलेत. तसेच वेटिंग लिस्टची समस्या कमी होईल.

आज 1 जानेवारी 2025 पासून लागू झालेल्या नवीन नियमांनुसार, वेटिंग तिकीट आता फक्त जनरल डब्यात मान्य असणार आहे. रिझर्व्हेशन किंवा AC डब्यात वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. वेटिंग तिकीट असलेले प्रवासी केवळ जनरल डब्यात प्रवास करू शकणार आहेत.

Indian Railway
Amrit Bharat Train: गुड न्यूज! मुंबईसह 'या' प्रमुख शहरांना मिळणार १०० अमृत भारत ट्रेन; तिकीट- मार्ग आणि वैशिष्ट्ये काय?

रिझर्व्हेशन डब्यात वेटिंग तिकीटावर प्रवास केल्यास दंड आकारला जाईल. तर तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियासुद्धा यावेळी अधिक सुव्यवस्थित करण्यात आलीय. आता प्रवासी AC क्लाससाठी सकाळी 10 वाजता आणि Non-AC क्लाससाठी सकाळी 11 वाजता तात्काळ तिकीट बुक करू शकतात.

रेल्वेकडून रिफंड पॉलिसी नवीन आखण्यात आलीय. जर ट्रेन रद्द झाली किंवा तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाला तर प्रवाशांना रिफंड केलं जाणार आहे. तर सीट वाटप प्रक्रिया अधिक चांगली करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com