Vaishno devi tourism : खुशखबर! वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणं झालं सोप्पं; मुंबईसह या शहरातून धावणार स्पेशल ट्रेन

Special Train for Vaishno Devi: वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणे आता सोपे झाले आहे. वैष्णोदेवी, मुंबईसाठी स्पेशल ट्रेन धावणार आहे. वाचा सविस्तर
Indian Railway
express News:Google
Published On

भारतीय रेल्वेने पुष्पक एक्स्प्रेसमधील वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता आणखी एक पुष्पक एक्स्प्रेस ट्रेन चालवण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरी पुष्पक एक्स्प्रेस ही ३ महिन्यानंतर लखनऊच्या गोमती नगर स्टेशनमधून चालवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त लखनऊ ते भोपालसाठी वंदे भारत ट्रेन चालवण्यात येणार आहे. तसेच पुरी, मुंबई आणि माता वैष्णोदेवीसाठी नव्या ट्रेन चालवण्यात येणार आहे.

सर्व ट्रेन सुरु करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. रेल्वेचे लखनऊ मंडळाचे डीआरएम गौरव अग्रवाल यांनी सांगितलं की, गोमती नगर स्टेशचा दुसरा टप्पा २ महिन्यांनी तयार होणार आहे. या स्टेशनवर ट्रेनची संख्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. पुष्पकसारखी आणखी एक ट्रेन सुरु करण्यासाठी १३ वर्षांआधी प्लान होता. लखनऊ जंक्शनहून पुष्पक एक्स्प्रेस रवाना करण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, आता गोमती नगर स्टेशनहून ट्रेन सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे. ही ट्रेन सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता रेल्वेच्या परवानगीची प्रतिक्षा आहे.

डीआएमनुसार, लखनऊ ते पटनासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. आता भोपाळसाठी देखील वंदे भारत ट्रेन चालवण्यात येईल. लखनऊहून पुरीसाठी नव्या ट्रेन चालवण्यात येणार आहे. त्यात नीलांचल एक्स्प्रेसचाही समावेश आहे. माता वैष्णो देवी आणि मुंबईसाठी देखील एक ट्रेन चालवण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. डीआरएम गौरव अग्रवाल यांनी सांगितलं की, हाय स्पीड ट्रेनसाठी तिसरी आणि चौथा मार्ग तयार करण्यावर भर आहे. काही अमृत स्टेशन पुढील महिन्यात तयार होणार आहे.

डबल डेकर एक्स्प्रेस

दिल्ली जाणारी डबल डेकर एक्स्प्रेस ही सीतापूरहून पीलीभीतमार्गे दिल्लीला चालवण्याची तयारी सुरु झाली आहे. या ट्रेनसाठी वेळापत्रक देखील तयार करण्यात आलं आहे. गोमती नगरहून डिब्रूगढदरम्यान माँ कामाख्याला जाण्यासाठी नवी ट्रेन सुरु होऊ शकते. रेल्वेच्या सूत्रांनुसार, रेल्वेनेही याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. गोमतीनगर ते डिब्रूगढदरम्यान नव्या ट्रेन चालवण्यात येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com