

निर्यातीवरील बंधनांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील विश्वसनीयता कमी झालीय.
देशांतर्गत धोरणे आणि जागतिक स्पर्धेमुळे कांदा उत्पादकांना मोठं आर्थिक नुकसान झालंय.
बांगलादेश, सौदी आणि फिलिपिन्स यांनी पाकिस्तान, येमेन आणि इराणकडून कांदा खरेदी सुरू केलीय.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. भारतीय कांद्याचे प्रमुख आयातदार असलेले बांगलादेश, सौदी अरब आणि फिलिपिन्स या देशांनी भारतीय कांद्याकडे पाठ फिरवलीय. त्याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसलाय. केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय. देशातील महागाई कमी करण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर बंधणं आणल्यानं हे देश पाकिस्तान येमेन आणि इराणकडून कांदा मागवत आहेत.
महत्त्वाच्या बाजारपेठा गमावल्यामुळे कांद्याचा दर घसरलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढणं अवघड झालंय. भारतीय कांद्याच्या निर्यातीत मोठी घट होण्यामागे केवळ देशांतर्गत धोरणेच नव्हे, तर आयातदार देशांनी घेतलेले निर्णयही जबाबदार आहेत. देशातील महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार कांदा निर्यात शुल्क वाढवले. अस्थायी निर्यात बंदी यासारखे निर्णय घेतल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांची विश्वासार्हता कमी झालीय.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार निर्यातबंदीच्या निर्णयामुळे बांगलादेशने आता स्थानिक उत्पादन वाढवण्यावर भर दिलाय. यासह त्यांनी पाकिस्तान आणि चीन यांसारख्या पर्यायी पुरवठादारांकडून कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशातील स्थानिक कांदा बाजारात आला आहे, त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी भारताकडून खरेदी करणे जवळपास थांबवलंय. यासह सौदी अरेबियाने भारतीय निर्यातदारांना आयात परवाने देणे थांबवले आहेत.
सौदीला येमेन आणि इराणकडून अधिक स्पर्धात्मक दरात कांदा मिळू लागलाय. दरम्यान भारतीय कांद्याचे बियाणे वापरून बांगलादेश, श्रीलंका आणि चीनसारखे देश आता स्वतः कांद्याचे उत्पादन घेऊ लागलेत. यामुळे शेतकरी अडचणी आलेत. अनेक बाजारांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांदा विकावा लागतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.