Instagram: तुम्ही जे बोलता किंवा विचार करता तेच इन्स्टाग्रामवर दिसतं? कारण काय? वाचा सविस्तर

Instagram Reels And Advertisement: इन्स्टाग्रामवर अनेकदा तुम्ही जे बोलता किंवा जो विचार करतात त्याच जाहिराती दिसतात. या जाहिराती दिसण्यामागचं कारण आता समोर आले आहे.
Instagram
InstagramGoogle
Published On

इन्स्टाग्राम हे खूप प्रसिद्ध सोशल मिडिया अॅप आहे. इन्स्टाग्रामवर लाखो युजर्स आहेत. दरम्यान, इन्स्टाग्राम अनेक जाहिरातीदेखील येतात. अनेकदा आपण जे बोलतो किंवा जो विचार करतो त्याच जाहिराती आपल्याला दिसतात. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो की, इन्स्टाग्रामला आपलं बोलणं कसं समजतं किंवा आपल्या मनात ज्या वस्तूंबाबत आपण विचार करतो त्याच्याच जाहिराती कशा येतात? यामुळे इन्स्टाग्रामच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले होते.

Instagram
Namo Udyan Scheme 2025 : ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी प्रत्येकी १ कोटींचा निधी, एकनाथ शिंदेंची घोषणा

इन्स्टाग्राम तुमचे बोलणे ऐकतो किंवा तुमच्या वैयक्तिक माहितीवरुन तुम्हाला जाहिराती दाखवतो, असं अनेकजण म्हणतात. जर असं असेल तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. दरम्यान, आता याबाबत स्वतः इन्स्टाग्रामचे प्रमुखांनी माहिती दिली आहे.

इन्स्टाग्राम प्रमुखांनी सांगितलंय की, आम्ही युजर्संना खात्री देतो की अॅप किंवा फोनच्या मायक्रोफोनच्या माध्यमातून आम्ही तुमचे बोलणे ऐकत नाही. त्यामुळे इन्स्टाग्रामबाबत कोणतीही चिंता बाळगण्याची गरज नाही.

इन्स्टाग्राम प्रमुखांनी काय सांगितले?

इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी सांगितले की, आम्ही तुमचे कोणत्याही प्रकारचे बोलणे ऐकत नाही. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी मायक्रोफोनचा वापर करत नाही.जर इन्स्टाग्राम खरंच तुमचे चॅट्स रेकॉर्ड करत असेल तर ते तुमच्या सहज लक्षात येईल.

Instagram
Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

आपण जे बोलतो त्याच्या जाहिराती का दिसतात?

मोसेरी यांनी सांगितले की, मेटा सारख्या कंपन्या बिझनेस मॉडेल फॉलो करते. जे तुमच्या वेबवर तुमच्या आवडीच्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते.त्यासाठी जाहिरातीच्या कंपनीसोबत काम करते. ज्यामध्ये वेबसाइटवर आणि फीडवर तुम्हाला जे आवडेल ते दाखवण्याचा प्रयत्न करते.

Instagram
Social Media: सोशल मीडियावर राहणार सरकारचं कंट्रोल; नेपाळ आणि लद्दाखमधील हिंसक आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com