
आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर आपण मात करायला हवी. यासाठी फक्त मेहनत हा एकच पर्याय आहे. अनेकजण आपल्या मेहनतीच्या जोरावर विविध क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत. असंच नाव अनेक आयएएस ऑफिसरने मिळवलं आहे. यातीलच एक आयएएस अधिकारी म्हणजे श्वेता अग्रवाल. श्वेता यांनी फार कमी वयात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.
श्वेता यांनी एकदा नव्हे तर सलग तीनदा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी शेवटी आपले स्वप्न पूर्ण केले.श्वेता यांनी २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षेत १९वी रँक मिळवली.
श्वेता अग्रवाल यांचा जन्म पश्चिम बंगालमधील एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील किराणा दुकान चालवायचे.श्वेता यांच्या जन्माच्यावेळी त्यांचे आईवडिल फार खूश नव्हते. त्यांना मुलगा हवा होता. परंतु त्यानंतरही त्यांनी आपल्या मुलीला खूप शिकवण्याचा निर्णय घेतला. श्वेतानेदेखील आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
श्वेता यांनी दोन वेळा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. परंतु त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. पहिल्या वेळी त्यांनी ४९७ रँक मिळाली. तेव्हा त्यांची निवड आयआयएस पदी झाली. त्यानंतर त्यांना पुढच्या प्रयत्नात १४१ रँक मिळाली. शेवटी २०२६ मध्ये त्यांना यूपीएससी परीक्षेत १९वी रँक मिळाली. त्या आयएएस अधिकारी झाल्या.
श्वेता यांनी कोलकत्ता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पदवी मिळवली. त्यांच्या वडिलांच्या सपोर्टमुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी आपल्या अभ्यासात कधीच खंड पडू दिला नाही.त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचे त्यांना यश मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.