Success Story: यशाचा शॉर्टकट नाही! रोज १५-१६ तास अभ्यास, कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय UPSC क्रॅक; IAS वंदना मीना यांचा प्रवास

Success Story of IAS Vandana Meena: आयएएस वंदना मीना यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या दिवसाला १५-१६ तास अभ्यास करायच्या.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत हा एकच पर्याय असतो. मेहनतीशिवाय कोणालाही यश मिळत नाही. त्यासाठी कधीकधी अनेक गोष्टींचा त्यागदेखील द्यावा लागतो. परंतु आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा त्याग महत्त्वाचा असतो. असंच काहीसं आयएएस वंदना मीना यांच्यासोबत झालं.

आयएएस वंदना मीना यांनी दिवसरात्र एक करुन यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. या मेहनतीचं त्यांना फळ मिळालं.

Success Story
Success Story: डॉक्टर बनली, UPSC परीक्षेत मिळवलं यश; साडेसात वर्षे IAS पदी काम केल्यानंतर सोडली नोकरी; डॉ. तनू जैन यांचा प्रवास वाचा

वंदना मीना या मूळच्या राजस्थानमधील टोकसी या गावच्या रहिवासी. त्यांच्या गावात अनेक जीवनावश्यक गोष्टीदेखील नव्हत्या. त्यांनी वडील दिल्ली पोलिसांत कार्यरत होते. त्यांची आई गृहिणी होती. वंदना यांना लहानपणापासूनच अभ्यासात गोडी होती. गावात कमी सोयीसुविधा असतानाही त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.

यानंतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी वंदना यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्या आपल्या कुटुंबासोबत दिल्लीला आल्या.

दिल्लीती सेंट कोलम्बा या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून मॅथ्समध्ये ऑनर्स डिग्री प्राप्त केली. त्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये खूप चांगले मार्क्स होते. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

वंदना यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करताना १५ ते १६ तास अभ्यास केला. त्यांनी कोणताही शॉर्टकट घेतला नाही. मेहनत करुनच आपली स्वप्ने पूर्ण होतात, असा विश्वास त्यांना होता.

Success Story
Success Story: लहानपणीच दृष्टी गेली, पण जिद्द नाही सोडली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; महाराष्ट्राची लेक प्रांजली पाटील यांची यशोगाथा

वंदना यांचा हा विश्वास खरा ठरला अन् २०२१ मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँकमध्ये ३३१ मिळवली. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या आईवडिलांना खूप गर्व वाटला.वंदना यांनी कधीच कोणताच शॉर्टकट वापरला नाही. त्यांनी मनापासून खूप मेहनत केली आणि त्याचे यश त्यांना मिळाले.

Success Story
Success Story: शाळेत शिक्षिकेनं मारलं, मनाशी खूणगाठ बांधली; मुंबई गाठली, २ वेळा अपयशानंतरही खचले नाहीत, IPS विश्वास नांगरे पाटील यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com