

HSRP नंबरप्लेट बसवण्याची मुदत संपली
मुदतीनंतर नंबरप्लेट बसवता येणार का?
नंबरप्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार?
एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. त्यानंतर अजूनही अनेकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. दरम्यान, आता ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही. त्यांनी काय करावं, सध्या नंबरप्लेट बसवता येणार का, नंबरप्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार असे अनेक प्रश्न वाहनधारकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
मुदतीनंतर HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? (Can we Still Install HSRP Number Plate After Deadline)
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. दरम्यान, यानंतरही तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवू शकता परंतु यासाठी तुम्हाचा दंड भावा लागू शकतो. दरम्यान जर तुम्ही ३१ डिसेंबरआधी बुकिंग केले असेल अन् नंबरप्लेट अजून बसवली नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही.परंतु डेडलाइननंतरही तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
किती दंड भरावी लागेल? (HSRP Number Plate Penalty)
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्यांनी अजूनही नंबरप्लेट इन्स्टॉल केली नाही त्यांना दंड भरावा लागेल. सुरुवातीला हा दंड १००० रुपये निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा तुमच्याकडून तीच चुक घडली तर तुम्हाला ५००० ते १०,००० रुपये दंड भरावा लागेल. त्यामुळे सर्व वाहनधारकांना एचएसआपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. (How to Install HSRP Number Plate)
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी खर्च किती? (HSRP Number Plate Installation Charges)
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी फी चार्ज केली जाते.
टू व्हिलरसाठी- ५३१ ते १,३२५ रुपये खर्च येणार आहे.
थ्री व्हिलर (ऑटो रिक्षा)- ५९० रुपये
चारचाकी वाहने- ८७९ ते २०५० रुपये
कमर्शियल वाहने- १,३४५ ते २०६० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.