Ration Card: रेशन कार्डमधून नाव कमी करायचेय? ऑफिसात चकरा मारायची गरज नाही, घरबसल्या करा काम

Ration Card News: गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्डवर कमीत कमी किंमतीत रेशन दिले जाते. जर कोणाला रेशन कार्डमधून एखाद्या व्यक्तीचे नाव काढायचे असेल तर प्रक्रिया काय आहे. ते जाणून घ्या.
Ration Card
Ration CardSaam Tv
Published On

केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील नागरिकांना स्वस्त किंमतीत अन्नधान्य मिळावे, यासाठी रेशन कार्ड दिले आहेत. रेशन कार्डवर सर्वसामान्यांना कमीत कमी किंमतीत रेशन मिळते. रेशन कार्डवर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे असतात. कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवरुन धान्य दिले जाते. (Ration Card News)

Ration Card
PF Interest Rate: EPFO सदस्यांना मिळणार सोन्यासारखा परतावा! PF वरील व्याजदर वाढण्याची शक्यता

रेशन कार्डवर अनेकजण कुटुंबातील नवीन सदस्यांचे नाव अॅड करतात. तर अनेक लोकांना रेशन कार्डवरील नाव कमी करायचे असते. मुलगी लग्न होऊन सासरी गेल्या तिला तिकडच्या रेशन कार्डवर नाव टाकायचे असेल तर माहेरच्या रेशन कार्डवरील नाव कमी करावे लागणार आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने रेशन कार्डवरील नाव कमी करु शकतात.

कुटुंबातील मुख्य सदस्याच्या नावावर रेशन कार्ड असते. त्यानंतर इतर सदस्यांची नावे असतात. जर कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला तर तुम्ही त्यांचे नाव काढून टाकू शकतात.

ऑनलाइन पद्धत (Ration card news)

रेशन कार्डवरील एखाद्या व्यक्तीचे नाव काढण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया आहे. तुम्ही घरबसल्या नाव कमी करु शकतात. यासाठी तुम्हाला अन्नधान्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर रेशन कार्ड डिटेल्स टाकून लॉग इन करावे लागेल.

यानंतर रेशन कार्डवरील नाव बदलायचे या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर त्या व्यक्तीचे नाव काढायचे आहे त्यांच्या नावावर क्लिक करा. यानंतर नाव का काढायचे आहे आणि त्याचा पुरावा सादर करायचा आहे.यानंतर त्या व्यक्तीचे नाव काढले जाते.

Ration Card
PPF Scheme: रोज १०० रुपये भरा अन् १० लाख मिळवा; या सरकारी योजनेत मिळतो भरघोस परतावा

ऑफलाइन पद्धत

तुम्ही रेशन कार्डवरील कोणाचे नाव काढण्यासाठी ऑफलाइन पद्धतदेखील वापरु शकतात. तुम्ही तुमच्या परिसरातील अन्नधान्य विभागाच्या ऑफिसवर जाऊ शकतात. त्यानंतर ज्या व्यक्तीचे नाव काढायचे आहे त्यांचा मृत्यूचा दाखला द्यावा लागणार आहे. यानंतर कागदपत्रे अपलोड द्यावी लागणार आहे. यानंतर त्या व्यक्तीचे नाव काढून टाकले जाईल.

Ration Card
SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! एकदा गुंतवणूक करा, मिळणार ७.६० टक्के परतावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com