Ration Card : सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द; संभाजीनगर जिल्ह्यात ४ हजार कर्मचाऱ्यांना दणका

Sambhajinagar News : स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब लाभार्थींना धान्य अत्यल्प दरात पुरविले जाते. चांगला पगार असलेले सरकारी कर्मचारी देखील गरिबांच्या धान्यावर डल्ला मारत असल्याचा प्रकार निदर्शनास आला
Ration Card
Ration CardSaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : रेशन कार्डवरून स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात येत असतो. गोर गरिबांना याचा फायदा मिळत असतो. असे असले तरी सरकारी नोकरीला असताना देखील अनेकजण रेशन कार्डावर धान्य घेत असतात. मात्र अशा कर्मचाऱ्यांवर पुरवठा विभागाने लक्ष देत रेशन कार्ड रद्द करण्याची कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत संभाजीनगर जिल्ह्यातील ४ हजार कर्मचाऱ्यांचे कार्ड रद्द करण्यात आले आहे.  

स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीब लाभार्थींना स्वस्तात अन्न- धान्याचा पुरवठा केला जातो. ते धान्य अत्यल्प दरात पुरविले जाते. मात्र चांगला पगार असलेले सरकारी कर्मचारी देखील या गरिबांच्या अन्नधान्यावर डल्ला मारत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. यामुळे काही लाभार्थ्यांना पुरेसा धान्याचा लाभ मिळत नसल्याचे पाहण्यास मिळते. परिणामी पुरवठा विभागाकडून अशा कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

Ration Card
Nagpur News : काबाडकष्ट करणाऱ्या महिला घेणार ताज हॉटेलमधील चहाचा स्वाद; २० कष्टकरी महिलांना जीवाची मुंबईची सफर

जिल्ह्यातील ४४२७ कर्मचाऱ्यांचे रेशन बंद 

रेशन धान्य वाटपाचा लाभ जिल्ह्यातील असंख्य शासकीय कर्मचारी घेत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाकडून विशेष मोहीम राबवून याबाबत पडताळणी करण्यात आली. या पडताळणीनंतर संभाजीनगर जिल्ह्यातील ४ हजार ४२७ शासकीय कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द केले आहेत. अर्थात आता या सरकारी नोकरदारांना रेशनचे धान्य घेता येणार नाही. 

Ration Card
Soyabean : सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढ बाबत पणन विभागाचे स्पष्टीकरण; केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा

धान्य विक्री व्हावी बंद 

दरम्यान गरिबांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी रेशन दुकानातून धान्याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र रेशन दुकानातून हे धान्य घेऊन त्याची विक्री केली जात असल्याचे देखील अनेकदा समोर आले आहे. रेशनचे धान्य घेऊन त्याची विक्री केली जात असल्याचा हा प्रकार सर्रासपणे सुरु असून यावर देखील निर्बंध लागणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com