Aadhaar Card Update: आधार कार्डबाबत ही एक चूक तर झाली नाहीना? अन्यथा सरकारी योजना बंद होणार

Aadhaar Card Mobile Number : आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा असतो. त्यामध्ये तुमची सगळ्यात महत्वाची माहिती नमूद केलेली असते. Uidai च्या नियमानुसार आधार केंद्रावर जाऊन फॉर्म भरून ५० रुपये शुल्कात मोबाईल नंबर बदलता येतो.
Aadhaar Card Update
Aadhaar Card Updatesaam tv
Published On

आधार कार्ड हा सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे. लहान मुलांच्या शाळेपासून ते सिम कार्ड घेण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये आधार कार्डाचा वापर केला जातो. यामध्ये तुम्हाला आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबर ओटीपी पाठवला जातो. तोच ओटीपी तुम्हाला तुमच्या सर्व कामांसाठी महत्वाचा असतो. पण तुमच्या मोबाईल नंबरमध्ये काही चूक झाली असेल किंवा चुकीचा नंबर आधारशी जोडलेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये वेळीच दुरुस्ती करावी लागू शकते.

तुमचाही आधार कार्डशी जोडलेला नंबर चुकीचा असेल तर तुम्ही आताच त्यामध्ये बदल करा. कारण सरकारी कामांमध्ये आधार कार्ड खूप महत्वाचा पुरावा मानला जातो. त्यात जर काही चुका असतील तर तुमची कामं अपूर्णच राहतील. तसेच सध्या डिजिटल कामांमध्ये आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवरच ओटीपी दिला जातो. त्यात अचडणी न याव्यात यासाठी तुम्ही पुढील प्रोसेस फॉलो करू शकता.

Aadhaar Card Update
Maharashtra ST Bus: ... तर एसटी बसमधील अर्ध्या तिकीटावरचा प्रवास होणार बंद, आत्ताच करा हे काम

बऱ्याचदा तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असला तर दुसऱ्या व्यक्तीला तुमचा OTP जातो. त्यामुळे तुमची सर्व माहिती इतरांपर्यंत पोहोचते. याने खातंही रिकामं होऊ शकतं. चला पुढील माहितीत आपण आधार कार्डाचा मोबाईल नंबर बदलण्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊयात.

तुम्हाला आधार कार्डावरील महत्वाचे घरच्या घरी करता येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावं लागतं. UIDAI ने हा नियमच आहे. आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला एक आधार अपडेट फॉर्म जमा करावा लागतो. ही अगदी सोपी आहे. तुम्हाला यामध्ये कोणताही पुरावा सादर करावा लागत नाही. तुम्ही फॉर्ममध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक लिहाला हवा. तुम्हाला यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागतात. मग ९० दिवसांच्या आत तुम्हाला अपडेट झालेला एसएमएस पाठवला जातो.

Aadhaar Card Update
PM Kisan Yojana: १८ जूनला ₹२००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com