सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले बहुतेक जण श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात. बहुतेक मध्यमवर्गीय कर्मचारी महिन्याला पैशांची बचत करून आयुष्य सुंदर करण्याचा विचारात असतो. मात्र, फार कमी लोकच त्यांचे भविष्यासाठी चांगली पैशांची बचत करून निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी चांगली तरतूद करतात. तर काही अपयशी होतात. परंतु ५५५ चा फॉर्म्युला जाणून घेतल्यास नोकरीतून निवृत्त होण्याआधीच कोट्यधीश होऊ शकता. तुम्ही नोकरीतून निवृत्त होण्यााधीच आर्थिकरित्या स्वातंत्र्य होऊ शकता. (Latest Marathi News)
कोट्यधीश होण्याचा फॉर्म्युला २५ व्या वयापासून सुरु करावा लागेल. तुम्हाला त्यासाठी एकूण 30 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तसेच प्रत्येक पाच वर्षांनंतर तुम्हाला गुंतवणुकीची रक्कम वाढवावी लागेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तुम्हाला गुंतवणुकीची सुरुवात ही वयाच्या २५ वर्षापासून सुरु करावी लागेल, त्यानंतर वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. या फॉर्म्युल्यानुसार ही गुंतवणूक करताना प्रत्येक ५ वर्षांनी गुंतवणुकीची रक्कम ५ टक्क्यांनी वाढवावी लागेल. अशी गुंतवणूक ३० वर्षांनी करावी लागेल. ५५५ च्या फॉर्म्युल्यानुसार गुंतवणूक केल्यास ३० वर्षांनंतर तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.
तुम्ही ५५५ च्या फॉर्म्युल्यानुसार २००० रुपयांपासून गुंतवणूक सुरु केली तरी वयाच्या ५५ व्या वर्षी कोट्यधीश व्हाल. यासाठी तुम्हाला वयाच्या २५ व्या वर्षांपासून SIP सुरु करावी लागेल. एसआयपीमधून काही काळ चांगला परतावा मिळतो.
तुम्ही २००० रुपयांपासून वयाच्या २५ व्या वर्षापासून एसआयपी सुरु केली. त्यानंतर दर पाच वर्षांनी एसआयपी रक्कम पाच टक्क्यांनी वाढवावी लागेल. यानुसार ३० वर्षांनी तुमची गुंतवणुकीची रक्कम १५,९४,५३२ रुपये इतकी होईल. त्यानंतर १२ टक्क्यांच्या व्याजानुसार परतावा हा ८९,५२,२८० रुपये मिळेल. त्यानुसार वयाच्या ५५ व्या वर्षी एकूण गुंतवणुकीची रक्कम १,०५,४६,८१२ रुपये होईल. तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार ५००० रुपयांची गुंतवणूक केल्यास वयाच्या ५५ व्या वर्षी २,६३,६७,०३० रुपये इतके होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.