MS Dhoni : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त तरी अमाप संपत्तीचा मालक, कॅप्टन कूलचं साम्राज्य किती करोडोंचं?

CKS MS Dhoni Property : क्रिकेटमधून मिळणाऱ्या कमाईव्यतिरिक्त धोनीचे अनेक मोठे व्यवसाय देखील आहेत. त्याने कपडे, हॉटेल आणि क्रीडा व्यवस्थापन कंपन्यांसह अनेक मोठ्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
MS Dhoni Property
MS Dhoni PropertySaam Tv News
Published On

मुंबई : किक्रेट विश्वातील एक खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांना देशवासीयांकडून खूप प्रेम मिळालं आहे. कालच्या सामन्यात एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार म्हणून त्यानं पुनरागमन केलं. पण अपेक्षेप्रमाणे संघाला तो यश मिळवून देऊ शकला नाही. धोनी देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असून त्याची एकूण संपत्ती १००० कोटींपेक्षा जास्त असल्याचं मानलं जातं. ‘कॅप्टन कूल’ किंवा ‘थाला’ म्हणून ओळखला जाणाऱ्या धोनीने आपले पैसे अनेक व्यवसायांमध्ये गुंतवले आहेत.

क्रिकेटमधून मिळणाऱ्या कमाईव्यतिरिक्त धोनीचे अनेक मोठे व्यवसाय देखील आहेत. त्याने कपडे, हॉटेल आणि क्रीडा व्यवस्थापन कंपन्यांसह अनेक मोठ्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे. महेंद्रसिंग धोनीचा रिती स्पोर्ट्स नावाच्या व्यवस्थापन कंपनीत हिस्सा आहे. या क्रीडा व्यवस्थापन कंपनीद्वारे जगातील अनेक मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचे व्यवस्थापन हाताळते. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार हे रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे क्लायंट आहेत.

MS Dhoni Property
Amit Shah : स्वत:ला आलमगीर म्हणणाऱ्याची कबर महाराष्ट्रात - अमित शाह

त्याचवेळी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी प्रसिद्ध कपड्यांचा ब्रँड Sevenचा मालक आहे. धोनी जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. त्याऐवजी चेन्नई सुपर किंग्जच्या या स्टार खेळाडूचे इतर अनेक व्यवसाय आहेत. एमएस धोनी मूळ गावी रांचीमध्ये माही रेसिडेन्सी नावाचं एक मध्यम श्रेणीच्या हॉटेलचा मालक आहे. जे Airbnb, Oyo आणि MakeMyTrip सारख्या लोकप्रिय हॉस्पिटॅलिटी प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध आहे.

धोनीने बंगळुरूमध्ये एमएस धोनी ग्लोबल स्कूल देखील उघडलं आहे. जी सीबीएसई इंग्रजी माध्यमची शाळा आहे. मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला यांच्याशी भागीदारी करून धोनीची ही शाळा विद्यार्थ्यांना एक अनोखा शैक्षणिक अनुभव प्रदान करते. त्याचवेळी, धोनीने पेय ब्रँड आणि चॉकलेट कंपनी ७ इंक ब्रूजमध्येही मोठी गुंतवणूक केली असून धोनीच्या सिग्नेचर हेलिकॉप्टर शॉटपासून प्रेरित होऊन त्याने हेलिकॉप्टर ७ लाँच केलं आहे.

MS Dhoni Property
Kalyan News: महापालिका निवडणुकांसाठी शिंदे गटाने कंबर कसली; शिवसेनेकडून भव्य संपर्क अभियान सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com