
मुंबईत आज पार पडलेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तृत संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. हे अभियान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पश्चिमेतील ३८ प्रभागांमध्ये राबवले जाणार आहे, अशी माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.
पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय शिवसेनेतर्फे आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील ३८ प्रभागात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.
टिटवाळा येथील महागणपतीचे दर्शन घेऊन या संपर्क अभियानाला प्रारंभ होईल, असे विश्वानाथ भोईर म्हणालेत. तसेच या अभियानाला आपल्यासह पक्षाचे सर्वच प्रमूख पदाधिकारी उपस्थित असणार असल्याचे, भोईर यांनी स्पष्ट केलं.
या अभियानाअंतर्गत दर दिवशी एक वॉर्ड, अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि तेथील नागरिकांना एकत्रितपणे भेटण्याचा कार्यक्रम आम्ही आखू, असंही भोईर यांनी सांगितलं.
एकत्रितपणे भेटण्याच्या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांना त्यांचे मनोगत, अडीअडचणी, पक्षवाढीसंदर्भात संवाद साधला जाईल. यासोबतच संबंधित प्रभागातील सामान्य नागरिकांनाही या संपर्क अभियानात सहभागी होऊन त्यांच्या नागरी समस्या आणि अडचणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलं.
कल्याण पश्चिमेतील ३८ प्रभागांमध्ये पुढील आठवड्यापासून हे अभियान राबविण्यात येणार असून, ही एकप्रकारे आगामी महापालिका निवडणुकीची नांदी असल्याचे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.