Gold Jewelery : घरात किती तोळे सोनं ठेवू शकतो? जाणून घ्या Income Tax चे नियम

Tax on Gold Jewelery Holdings : आपल्या घरात सोन्याचे दागिने किती तोळे ठेवू शकतो याविषयी अनेकांना माहित नाही. आयकर विभागाने यावर मर्यादा आखून दिली आहे.
Gold Jewelery
Gold Jewelerysaam Tv

Gold Storage Rule :

घरात फंक्शन असो, एखादा सणसमारंभ असो किंवा कुणाचे लग्न असो भारतीय घरात सोन्याचे दागिने पाहायला मिळतात. भारतीयांना सोन्याचे तसे विशेष आकर्षण आहे. सोनं म्हटलं की, लग्नसराई किंवा विशेष प्रसंगी त्याची खरेदी केली जाते.

भारतातील सर्वसामान्य नागरिक सोन्यात विशेष गुंतवणूक (Investment) करतात. वेळप्रसंगी विकून त्यातून कर्ज किंवा भांडवल उभारता येते. परंतु, आपल्या घरात सोन्याचे (Gold) दागिने किती तोळे ठेवू शकतो याविषयी अनेकांना माहित नाही. आयकर विभागाने (Income tax) यावर मर्यादा आखून दिली आहे.

घरामध्ये किती सोनं आणि दागिने ठेवता येते. यावर आयकर विभागाने मर्यादा ठरवली आहे. जर या नियमाचे पालन केले नाही तर घरातील सोने जप्त होऊ शकते. जाणून घेऊया सविस्तर

Gold Jewelery
Interesting Name Of Railway Station: बाप, चाचा, नाना, साली...; भारतातील भन्नाट रेल्वे स्टेशन, नाव ऐकून हसू थांबणारच नाही

आयकर नियमानुसार लग्न झालेल्या स्त्रीच्या नावावर घरात ५०० ग्रॅमपर्यंत सोनं ठेवता येते. जर स्त्रीचे लग्न झाले नसेल तर २५० ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेवता येते. परंतु, पुरुषांच्या बाबतीत असा कोणताही नियम घालण्यात आलेला नाही. घरातील कोणत्याही पुरुषांच्या नावावर १०० ग्रॅमपर्यंत सोनं ठेवता येते. कोणत्याही उत्पन्नाच्या स्त्रोताशिवाय घरात अधिक सोने सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते.

जर तुम्हाला सोने भेटवस्तू किंवा वारसा हक्काने मिळाले असेल तर आयकर विभागाला तुम्हाला त्याचे कागदपत्र दाखवावे लागेल. कौटुंबिक सेटलमेंट डीड, गिफ्ट डीडदेखील दाखवू शकता. ज्यामध्ये सोनं खरेदी केल्याची माहिती असेल. एखाद्या व्यक्तीकडे उत्पन्नाचा योग्य स्त्रोत असेल तर वारसा हक्काने मिळालेले सोनं घरामध्ये ठेवण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. आयकर विभाग यासंदर्भात कोणतेही प्रश्न विचारत नाही.

Gold Jewelery
Drinking Coffee Empty Stomach : रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे? होऊ शकते आरोग्यावर परिणाम, दुर्लक्ष नकोच!

1. कायदा काय सांगतो?

भारतामध्ये सुवर्ण नियंत्रण कायदा १९६८ यापूर्वी लागू होता. या अंतर्गत मर्यादेपेक्षा जास्त सोनं ठेवण्याची परवानगी नव्हती. परंतु, हा कायदा जून १९९० मध्ये रद्द करण्यात आला. सरकारने सोने होल्डिंगवर मर्यादा निश्चित करणारा कोणताही कायदा आणलेला नाही. त्यामुळे एखादी सर्वसामान्य व्यक्ती किंवा कुटुंब किती सोने ठेवू शकते यावर मर्यादा नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com