
एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता कॅश ट्रान्झॅक्शनच्या अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. यामुळे थेट बँकेच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. आता ग्राहकांना दर महिन्याला १ लाखापर्यंतचे व्यव्हार मोफत करण्यात येणार आहे. म्हणजेच या ट्रान्झॅक्शनवर कोणतेही शुल्क लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २ लाखांची होती.
एचडीएफसी बँकेच्या ट्रान्झॅक्शनवर आता शुल्क लागणार आहे. पहिल्या चार ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. मात्र, त्यानंतरच्या रोख व्यव्हारांवर १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.बँकेच्या या निर्णयाचा थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. दरम्यान, हे नवीन नियम १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत.
रोख व्यव्हारांच्या नियमांत बदल
आता प्रत्येक खात्यावर पहिले चार व्यव्हार मोफत असणा आहे. त्यानंतरच्या व्यव्हारांवर शुल्क आकारले जाणार आहे.
४ पेक्षा जास्त वेळा व्यव्हार केले तर प्रत्येक व्यव्हारामागे १५० रुपये द्यावे लागणार आहे.
थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शनवर दिवसभरासाठी मर्यादा २५००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
फंड ट्रान्सफरच्या नियमांत बदल
NEFT ट्रान्सफर शुल्क
आता तुम्हाला १०,००० रुपयापर्यंत ट्रान्झॅक्शन करायचे असेल तर २ रुपये शुल्क भरवे लागेल. १० हजार ते १ लाख रुपयांसाठी ४ रुपये शुल्क, १ लाख ते २ लाखांसाठी १४ रुपये आणि २ लाखांपेक्षा जास्त २४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
RTGS ट्रान्सफर शुल्क
२ लाख ते ५ लाख रुपयांवर २० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर ५० लाखांपेक्षा जास्त रुपयांवर ४५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
चेकबुकच्या नियमात बदल
आता सेव्हिंग अकाउंटवर १० पानांचे चेकबुक मोफत मिळणार आहे. याआधी २५ पानांचे चेकबुक मोफत मिळत होते. त्यानंतर अतिरिक्त पानांसाठी ४ रुपये आकारले जाणार आहेत.याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.