PAN Card New Rules: पॅन कार्डसंबंधी नियम बदलले; सरकारने केले ४ महत्वाचे बदल, जाणून घ्या

Income Tax India: पॅन कार्डसाठी सरकारने नवीन नियम लागू केले असून अर्ज प्रक्रिया, फॉर्म, फोटो आणि वैयक्तिक माहिती देण्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
PAN application update
PAN Card New Rulesgoogle
Published On

तुमच्या ओळखपत्रात आधार कार्डासोबत पॅन कार्डाचाही समावेश होतो. तुम्ही जर नवीन पॅन कार्ड काढण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण Income Tax Department ने 1 एप्रिलपासून पॅन कार्ड अर्ज प्रक्रियेत काही महत्वाचे बदल केले आहेत. यामध्ये नेमके बदल झालेत? कोणते नवे नियम लागू केलेत का? असे प्रश्न अनेकांच्या मनात येत असतात. पुढील माहितीत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

पॅन कार्डाच्या फॉर्ममध्ये कोणते बदल झाले?

आतापर्यंत पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म 49A आणि 49AA दिले जात होते. पण नव्या बदलामध्ये तुम्हाला हे दोन्ही फॉर्म रद्द करून त्यांच्या जागी चार नवीन फॉर्म भरावे लागतील. हे नवीन फॉर्म वेगवेगळ्या अर्जदारांच्या प्रकारानुसार तयार करण्यात आलेत. फॉर्म 93 हा भारतातील सामान्य नागरिकांसाठी आहे.

PAN application update
Kothimbir Paratha Recipe: मुलांना नाश्त्यात हेल्दी काहीतरी द्यायचंय? मग बनवा सॉफ्ट स्टफ कोथिंबीर पराठे

तर दुसरा फॉर्म 49A हा भारतीय कंपन्या आणि संस्थांसाठी लागू आहे. परदेशी नागरिकांसाठी फॉर्म 95 आणि परदेशात नोंदणीकृत कंपन्या किंवा संस्थांसाठी फॉर्म 96 लागू करण्यात आला आहे.

पॅन कार्डाच्या माहितीत कोणते बदल झाले?

तसेच यामध्ये आधीसारखं नावापुढे श्री, श्रीमती असा आदर लिहिण्याची गरज आता राहिलेली नाही. अर्जदाराने आपलं नाव आधार कार्डवर जसं आहे तसंच पूर्ण स्वरूपात लिहिणं अनिवार्य आहे. त्यात आईचे नाव सुद्धा बंधनकारक असणार आहे. तुम्ही अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणं आवश्यक असेल. कारण अर्जदारांना याचे थेट अपडेट्स आणि सूचना मिळतील. यात तुमची ओळख स्पष्ट व्हावी यासाठी फोटोसंदर्भातही नियम कडक करण्यात आले आहेत. मोठा आणि स्पष्ट फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

PAN application update
Solapur Summer Travel: सोलापूर फिरण्याचा प्लान करताय? या 8 थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com