Sakshi Sunil Jadhav
स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता करायचा असेल तर स्टफ कोथिंबीर पराठे हा सोपा पर्याय आहे. कमी वेळात तयार होणारा हा पराठा चव आणि आरोग्यासाठी बेस्ट आहे.
गव्हाचं पीठ, ताजी कोथिंबीर, हिरव्या मिरची, लसूण, जिरे, मीठ आणि मसाला इ.
गव्हाच्या पिठात मीठ आणि थोडं तेल घालून मऊसर पीठ मळून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा.
बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि मीठ एकत्र करून मिश्रण तयार करा.
कोथिंबीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. जे तुमचं पचन सुधारतात.
पिठाची छोटी पोळी लाटून त्यात कोथिंबीरीचे स्टफींग भरून पराठा लाटून घ्या.
गरम तव्यावर तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकवा.
गरमागरम पराठे दही, लोणचे किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
पराठा मऊ राहण्यासाठी पीठ जास्त कडक मळू नका आणि स्टफिंग ओलसर ठेवा. हा पराठा नाश्ता, डबा किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय आहे.