Government Employees Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगाराची ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार

Government Employees get half Salary as Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे.
Government Employees Pension
Government Employees PensionSaam Tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार

सुधारित पेन्शन योजनेची नियमावली जाहीर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शन योजनेची नियमावली राज्य शासनाने जाहीर केली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आली आहे. आता या सुधारित पेन्शन योजनेत २० पेक्षा जास्त वर्ष सर्व्हिस केलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पगाराच्या अर्धी म्हणजेच ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्तादेखील दिला जाणार आहे.

Government Employees Pension
8th Pay Commission: ५२,६०० रुपये मूळ वेतन अन् ५ फिटमेंट फॅक्टर, ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन पेन्शन योजना १ मे २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेचा आग्रह धरला आहे. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर आता सुधारित पेन्शन योजनेबाबत शासन निर्णय काढला आहे.

योजनेच्या अंबलबाजवणीसाठी शासनाने काही बाबी स्पष्ट केल्या आहे. आता पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीकडून निधीमधील ६० टक्के रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करणे अनिवार्य आहे. उरलेल्या ४० टक्के निधीचा वार्षिक तपशील शासनाला सादर करावा लागणार आहे.यानंतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या ६० टक्के रक्कम कुटुंबाला पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.

Government Employees Pension
Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; झटपट हे काम कराच अन्यथा पगार मिळणार नाही

दरम्यान, कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०२३च्या शासन निर्णयानुसार ग्रॅच्युटी मिळणार आहे. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही. तयांना केवळ मूळ राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

Government Employees Pension
Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पेन्शनचा प्रश्न अखेर सुटला, वाचा नेमका काय घेतला निर्णय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com