
अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या अॅपवर कारवाई
तब्बल २५ अॅपवर घातली बंदी
ALTT, ULLU या अॅपचाही समावेश
केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अश्लील कन्टेट दाखवणाऱ्या अॅपला दणका दिला आहे. आता सरकारने अनेक अॅप बंद केले आहेत. यामध्ये ALTT, ULLU, बिग शॉट्स या अॅपचा समावेश आहेत. याचसोबत एकूण २५ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या ओटीटी अॅपना दणका मिळाला आहे. (25 Apps Banned In India)
मिडिया रिपोर्टनुसार, माहिती व प्रसारण मंत्रालयाने या २५ अॅपवर बंदी घातली आहे. या २५ लिंकवर अश्लील जाहिराती दाखवल्या जात होता. यामुळे अनेक सरकारी नियमांचे उल्लंघन होते. माहित तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम 67 आणि 67a, भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम 294 कायद्याचे उल्लंघन करत आहे. त्यामुळेच सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या अॅपवर बंदी (These Apps Banned In India)
ALTT, ULLU, Big Shots App, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab App, Navarasa Lite,Gulab App, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, SoulTalkies,Adda TV HotX VIP, Halchan App, Moodx, NeonX VIP, Fugi,Mozflix या अॅपवर बंदी घालण्यात आले आहे.
सरकारने एक अधिसूचना जारी केली हे की, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना या अॅप किंवा वेबसाइटपर्यंत सेवा पुरवणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अॅपवर अश्लील कन्टेट दाखवला जायचा. याचसोबत अॅपवर येणाऱ्या जाहिरातीदेखील चांगल्या नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या अॅप आणि वेबसाइटवरुन तुम्हाला कोणताही कन्टेट पाहता येणार नाही.
सरकारने किती OTT अॅप्सवर बंदी घातली आहे?
केंद्र सरकारने एकूण २५ OTT अॅप्सवर बंदी घातली आहे.
कोणत्या अॅपवर घातली बंदी?
ALTT, ULLU, BigShots, Boomex, Feneo, ShowX, NeonX VIP, आणि इतर अॅप्स यामध्ये समाविष्ट आहेत.
सरकारने ही कारवाई का केली?
या अॅप्सवर अश्लील जाहिराती व कंटेंट दाखवले जात होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.