आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. स्मार्टफोनचा वापर करुन लोक कोणतीही माहिती अगदी चुटकीसरशी मिळवू शकतात. यात लोक फिरण्यासाठी, रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. परंतु गुगल मॅप्सचा वापर करताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.
गुगल मॅपचा वापर करुन लोक योग्य ठिकाणी सहजरित्या पोहचू शकता. गुगल मॅपचा वापर करताना तुम्हाला तुमच्या फोनचे लोकेशन ऑन करणे अनिवार्य असते. त्यामुळे तुमची सर्व माहिती गुगला माहित असते. या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्संना नेहमी आपली माहिती गुगल मॅपवरुन डिलीट करणे आवश्यक आहे.
गुगल मॅपवरुन माहिती डिलीट करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. स्मार्टफोनमध्ये युजर्संना प्रायव्हसी सेटिंग्जची सुविधा असते. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या गुगल मॅपची हिस्ट्री डिलीट करु शकतात. (Latest News)
गुगल मॅपची हिस्ट्री डिलीट कशी करायची?
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर गुगल मॅप अॅप ओपन करावा लागेल.
अॅपमध्ये तुम्हाला उजव्या बाजूच्या वरील भागात प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा. आता तुम्हाला Maps History चा पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर हिस्ट्री डिलीट करावे लागेल.
Google Maps वरुन लोकेशन हिस्ट्री कशी डिलीट करावी?
गुगल मॅपवरुन लोकेशनची हिस्ट्री डिलीट करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची माहिती इतर लोकांना कळणार नाही. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
सर्वप्रथम तुम्हाला गुगल मॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा.
सेटिंग्जमध्ये तुम्हाला टाइमलाइनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर सेटिंग्ज आणि प्रायव्हसीवर क्लिक करा.
त्यानंतर डिलीट हिस्ट्रीचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमची गुगल मॅपची हिस्ट्री डिलीट करु शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.