Union Budget 2024: पॅनकार्डशिवाय खरेदी करता येणार सोनं? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

Buying Gold Worth Up To rs 5 Lakh Without Pan Card : काही दिवसांपूर्वी अर्थमंत्रालयाने सोन्या-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार सरकार अर्थसंकल्पातील सोन्याच्या आयातीवरील कर कमी करु शकते.
Union Budget 2024, Gold Buying
Union Budget 2024, Gold Buying Saam Tv
Published On

Union Budget 2024 In Gold Buying :

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प मांडणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला ६ वा आणि पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थमंत्रालयाने सोन्या (Gold)-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार सरकार अर्थसंकल्पातील (Budget) सोन्याच्या आयातीवरील कर कमी करु शकते. तसेच पॅनकार्डशिवाय ५ लाख रुपयांपर्यंतचे सोने खरेदी करण्यास परवानगी देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जेम्स अॅन्ड ज्वेलरी इंडस्ट्रीने गोल्ड आयाती शुल्कावर बेसिक कस्टम ड्युटीच्या वाढलेल्या किमती मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच त्यात कर (Tax) रचना देखील लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष संयम मेहरा म्हणाले की, भारताच्या जीडीपीमध्ये ज्वेलरी उद्योगाचा वाटा हा सुमारे ७ टक्के आहे. यात बदल केल्यास याचा फायदा सरकारलाही होईल असे मेहरा यांनी सांगितले.

Union Budget 2024, Gold Buying
Gold Silver Rate (31st January 2024): अर्थसंकल्पापूर्वी सोने-चांदीचा भाव वधारला; तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील वाढणारे बीसीडी मागे घेण्यासाठी आम्ही अर्थमंत्रालयाला विनंती करतो, तसेच नवीन कर रचनाही विकसित करायला हवी असे देखील सांगण्यात आले आहे.

1. पॅनकार्डशिवाय मिळणार ५ लाख रुपयांचे सोने

सध्या १२.५ टक्के बीसीडी अॅड व्हॅलोरेमवर लावले जात आहे. ज्यामुळे सोन्यावरील आयाती शुल्क हे एकूण १८.४५ टक्के आकारण्यात येत आहे. तसेच सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे पॅन कार्डच्या व्यवहाराची मर्यादा सध्या २ लाखांपर्यंत आहे. परंतु, ती लवकरच वाढवून ५ लाखांपर्यंत करण्यात यावी अशी मागणी व्यापारांनी केली आहे. तसेच दैनंदिन खरेदीची मर्यादाही १ लाख रुपयांपर्यंत वाढवावी असे देखील म्हटले आहे. GJC ने हिरे आणि दागिने उद्योगासाठी EMI ची सुविधा ठेवावी असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com