Manasvi Choudhary
सध्या गुगलचा जमाना आहे असं आपण अनेकांच्या तोंडातून ऐकतो.
संपूर्ण विश्वाची माहिती असणाऱ्या गुगलचा शोध कधी आणि कसा लागला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना?
४ सप्टेंबर १९९८ रोजी गुगलचा शोध लागला.
१९९८ मध्ये अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकत असलेल्या लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची निर्मिती केली.
जेव्हा गुगलचा शोध लागला तेव्हा बॅकरूब असे नाव देण्यात आले होते. मात्र कंपनी रजिस्टर करताना चूक झाल्यामुळे GOOGOL असे नाव नोंद करण्यात आले.
GOOGOL ही गणिताची संज्ञा आहे ज्याचा अर्थ 1 आणि 00 म्हणजे 100 असा होतो नोंदणी करताना शुद्धलेखनात चूक झाल्यामुळे GOOGOL ऐवजी Google झाले.
गुगल (Google) शब्द बोलणे आणि लिहण्यास सोपा असल्याने रोजच्या वापरात लोक सहज वापरू लागले.
गुगल हे केवळ सर्च इंजिन म्हणून ओळखले जात नाही. तर ते युजर्सच्या फायदेशीर आणि उपयुक्त इतर अनेक सेवाही पुरवते.
गुगलचे जीमेल(Gmail),यूट्यूब(Youtube), गुगल मॅप (Google Map), गुगल ड्राईव्ह (Google Drive) या अॅप संपूर्ण जगभरात कार्यरत आहे.