
तुम्ही गुगल क्रोम दिवसातून कितीतरी वेळा वापरत असाल. गुगलमुळे प्रत्येकालाच खूप फायदा झाला. अनेकांच्या माहितीत भर पडली. जगातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर गुगलवर सापडतं. पण गुगल कामाच्या वेळेस स्लो चालत असेल तर... हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं नेमकं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
गुगल क्रोम जगातला प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. प्रत्येक नव्या मोबाईल फोनमध्ये गुगल ब्राउझर असतो. तसेच संगणक, लॅपटॉप याचा बाजारपेठेत तब्बल ६४.६८ टक्क्यांचा वाटा आहे. दिवस असो वा रात्र लोक याचा वापर करतच असतात. मात्र अनेकवेळा हा गुगल क्रोम अतीशय स्लो काम करतो. यामुळे युजर्सना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच महत्वाच्या कामामध्ये अडथळा सुद्धा निर्माण होतो.
तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर तुम्हाला त्याच्या स्लो चालल्याने कामात अडथळा येत असेल. ज्यामुळे तुमचे काम आणि प्रयत्न कमी पडत असतील तर काळजी करू नका. पुढे आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, जे तुम्हाला गुगल क्रोमचा स्पीड वाढवण्यास मदत होईल.
गुगल वेळोवेळी ब्राउजरमध्ये बदल करत असतं. या दरम्यान क्रोमचे सॉफ्टवेअर अपग्रेड केले जाते. यामुळे प्लॅटफॉर्मचा वेग वाढतो. शिवाय, एक नवीन सुरक्षा कवच उपलब्ध त्यात असते. त्यामुळे क्रोम अपडेट करायला विसरू नका. असे केल्याने ब्राउझर वेगाने काम करेल आणि तुमचा डेटाही सुरक्षित राहील.
तुम्ही जेव्हा गुगल क्रोमवर काही सर्च करता तेव्हा त्या फाईल्स तयार होतात आणि कॉम्प्युटरमध्ये साठवल्या जातात, त्याला आपण कुकीज आणि कॅशे म्हणतो. त्यावेळेवर जर डिलीट केल्या नाहीत तर तुमचा संगणकातले किंवा लॅपटॉपमधला गुगल क्रोम स्लो स्पीडने चालेल.
परफॉर्मन्स फीचर हे गुगल क्रोममधील एक फीचर आहे जे प्लॅटफॉर्मचा स्पीड वाढवू शकते. याचा वापर करण्यासाठी गुगल क्रोमच्या सेटिंगमध्ये जा. तिथे तुम्हाला स्पीड सेक्शन मिळेल, त्यातील प्रीलोड पेज ऑन करा. यामुळे ब्राउझरमधील शोध प्रक्रियेला वेग येईल आणि ब्राउझिंगचा चांगला अनुभव मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.