Government Scheme : पात्र महिलांना १ सप्टेंबरपासून ₹२५०० मिळणार, राज्य सरकारचा निर्णय, मोठी अपडेट आली समोर

Lakshmi Scheme : दिल्ली लक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना १ सप्टेंबर २०२६ पासून दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत. १८ दिवसांत ८ लाख महिलांनी नोंदणी केली असून अर्ज तपासणी प्रोसेस सुरू आहे.
Government Scheme
Government Schememeta ai
Published On

ज्या महिला सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतात त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने सुरू केलेली लक्ष्मी योजना ही सध्या चर्चेच आहे. याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता १ सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात दरमहा २,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. योजनेच्या लाभार्थींना २७ ऑगस्ट रोजी तालकरोगा स्टेडियम येथे आजोजित विशेष कार्यक्रमात अधिकृत पत्र देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली सचिवालयात लक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्य सचिव राजीव वर्मा तसेच जिल्हास्तरीय स्वीकृती, देखरेख आणि तक्रार निवारण समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Government Scheme
LPG eKYC : LPG ग्राहकांना दिलासा e-KYC ची तारीख वाढली! घरबसल्या फक्त काही मिनिटांत करा प्रोसेस

अर्जांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश

दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी प्रत्येक अर्जाची सखोल तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अर्जातली माहिती संशयास्पद असेल तर तिची योग्य प्रकारे पडताळणी केली जाईल. तपासणीची प्रोसेस लवकरात लवकर पूर्ण झाल्याने पात्र लाभार्थींच्या अर्जांवरही लवकर निर्णय घेता येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चुकीची माहिती दुरुस्त करण्याची संधी

अर्ज भरताना काही पात्र महिलांकडून चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली गेली तर त्यांना दुरुस्तीची आणखी एक संधी मिळणार आहे. यासाठी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लवकरच स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे अर्जात चूक झालेल्या पात्र महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Government Scheme
DA Hike: सरकारी कर्मचार्‍यांच्या DA मध्ये वाढ, आता पगारात किती भर पडणार? संपूर्ण कॅलक्युलेशन एक क्लिकवर

१८ दिवसांत ८ लाख महिलांचे रजिस्ट्रेशन

मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, योजना सुरू झाल्यानंतर फक्त १८ दिवसात ८ लाख महिलांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यापैकी ५ लाखांपेक्षा जास्त अर्ज अंतिम टप्प्यात जमा झाले आहेत. कमी कालावधीत मिळालेला हा प्रतिसाद उल्लेखनीय असल्याचं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं.

पात्र महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळावा आणि प्रक्रियेत कोणताही अनावश्यक उशीर होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून अर्जांची तपासणी आणि देखरेख केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com