8th Pay Commission : दिवाळीपूर्वी नवीन नोटिफिकेशन येणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष 'या' महत्त्वाच्या अपडेटकडे

Pensioners News : आठव्या वेतन आयोगाच्या नवीन नोटिफिकेशनकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On: 

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. तर आयोगाकडून विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि पेन्शनधारकांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे आता आयोगाच्या पुढच्या नोटिफिकेशनकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईत २२ आणि २३ ऑक्टोबरला बैठक

आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्य पॅनेलची मुंबईमध्ये २२ आणि २३ ऑक्टोबरला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कर्मचारी संघटना, विविध संस्था आणि पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जातेय.

8th Pay Commission
WhatsApp Update : ...तर तुमचंही Whatsapp होणार बंद, तुम्ही तर ही चूक करत नाहीत ना? आताच जाणून घ्या

आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरच्या ‘What's New’ या विभागानुसार, मुंबई दौऱ्याबद्दल नोटिफिकेशन २१ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलं होतं. याआधी बंगळुरू दौऱ्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. बंगळुरूमधल्या बैठका ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी नियोजित होत्या.

8th Pay Commission
PM Kisan Yojana : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होणार? 24व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

दिवाळीआधी नवीन नोटिफिकेशन येणार?

आता आठव्या वेतन आयोगाकडून पुढचे नोटिफिकेशन कधी जारी होणार, हा कर्मचाऱ्यांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. दिवाळीआधी आयोगाकडून नवीन माहिती प्रसिद्ध होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र, याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

नवीन नोटिफिकेशनमध्ये पुढची बैठक, सल्लामसलत किंवा आयोगाच्या कामकाजासंदर्भातली इतर माहिती असू शकते. त्यामुळे कोणतीही अधिकृत सूचना प्रसिद्ध होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी वाट पाहावी.

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी कधी लागू होणार?

केंद्र सरकारने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेला (Terms of Reference) मंजुरी दिली होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाला स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आता आपल्या शिफारशी सादर करायच्या आहेत. त्यानुसार अहवाल सादर करायची मुदत मे २०२७ च्या आसपास येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com