लग्नसराईचा मुहूर्त संपण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी आहे. अशातच सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ झाल्यामुळे खरेदीदारांना टेन्शन आले आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्षात अनेकांचा कल हा सोने खरेदीवर असतो परंतु, मागच्या काही दिवसांपासून सोन्यांने उच्चांकाची पातळी ओलांडली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाचा टप्पा गाठला होता.
दिवाळीच्या (Diwali) काळात सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार २४ कॅरेट सोन्याच्या (Gold) भावात २६० रुपयांनी वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८३५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,६४० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या भावात आज २६० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीही (Price ) किंचित घट झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,००० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १ किलोनुसार ५०० रुपयांनी घट झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई - ६३,४९० रुपये
पुणे - ६३,४९० रुपये
नागपूर - ६३,४९० रुपये
नाशिक - ६२,५२० रुपये
ठाणे - ६३,४९० रुपये
अमरावती - ६३,४९० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.