महागाईने पिचलेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. पुढील १५ महिने खाद्यतेल स्वस्त राहाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
खाद्यतेलाच्या (Oil) सीमाशुल्कातील कपातीची मुदत एक वर्षाने वाढवली ज्यामुळे किमती आटोक्यात राहातील आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार नाही. केंद्रातील मोदी सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचले आहे.
वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सोयबीन आणि सूर्यफुलाच्या तेलावरील आयात शुल्क १७.५ टक्क्यांवरुन १२.५ टक्के पर्यंत कमी करण्यात आले. कमी केलेले दर आता मार्च २०२५ पर्यंत लागू राहातील. आयात शुल्क कमी केल्यामुळे तेल देशात आणण्याचा खर्च कमी होईल.
1. सर्वाधिक खाद्यतेल कुठून येते?
भारतात प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पामतेल खरेदी केले जाते. अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची खरेदी केली जाते. कॅनडातून काही प्रमाणात खाद्यतेलाची आयात केली जाते.
गहू आणि तांदळाच्या बाबतीत भारत देश स्वावलंबी असला तरी खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही स्वावलंबी होऊ शकलेलो नाही. सध्या भारत हा जगातील खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश मानला जातो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.