सकाळी सराफ बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमती किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत त्यामुळे खरेदीदारांसाठी चांगली संधी मिळाली आहे.
जानेवारी महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात भाव वाढले होते परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. अशातच लग्नसराईचा काळ सुरु झाला असून खरेदीदारांचा कल अधिक सोने-चांदीवर असतो.
सकाळच्या सत्रात सोन्याचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पतझड पाहायला मिळाली. सराफ बाजार उघडताच २४ कॅरेटनुसार सोन्याच्या दरात ९० रुपयांनी घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे (Gold) भाव अस्थिर झालेलेही पाहायला मिळाले. अशातच जाणून घेऊया महाराष्ट्राह मुंबई-पुण्यातील आजचा भाव.
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७०५ रुपये (Price) मोजावे लागणार आहे. यामध्ये आज १० ग्रॅमनुसार १०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,२२० रुपये मोजावे लागतील. यात आज १० ग्रॅमनुसार ९० रुपयांनी घसरण झाली आहे.
आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या दरात १ किलोनुसार ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)
मुंबई- ६२,०७० रुपये
पुणे - ६२,०७० रुपये
नागपूर - ६२,०७० रुपये
नाशिक - ६२,१०० रुपये
ठाणे - ६२,०७० रुपये
अमरावती - ६२,०७० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.