Gold Silver Price: सोने-चांदी ऐन सणासुदीत महागले; सोने ७७ हजारांच्या पार; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Gold Silver Price Today 2nd October 2024: गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे. आज १ तोळा सोन्याची किंमत ७७ हजारांपेक्षाही जास्त आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.
Gold Silver Price
Gold Silver PriceSaam Tv
Published On

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. नवरात्रीनंतर लगेचच दिवाळी येणार आहे. दिवाळीनंतर लगीनसराईला सुरुवात होईल. त्यामुळे अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतील. सोने-चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सोने-खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.

सोने चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून ७५ हजारांपेक्षा जास्त आहेत. आज तर सोन्याचे भाव ७७४५० रुपये प्रति तोळा आहे. सोन्यासह चांदीच्याही किंमती वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करावी की नाही असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात निर्माण झाला आहे. (Gold Silver Price)

Gold Silver Price
New Internship Scheme: लाडक्या बहिणीनंतर आता भावांचा नंबर, तरुणांना दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या कसे?

२४ कॅरेट सोन्याची किंमत

१० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,४५० रुपये आहे. काल १ तोळ्याची किंमत ७६,९१० रुपये होती. आज सोन्याच्या किंमतीत जवळपास ५४० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६१,९६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,७४,५०० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ७१,००० रुपये प्रति तोळा आहे. काल २२ कॅरेट सोन्याची किंमत ७०,५०० रुपये होती. सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५६,८०० रुपये आहे.

१८ ग्रॅम सोन्याची किंमत

आज सोने ५८,०९० रुपये प्रति तोळा विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,४७२ रुपये आहे. या किंमतीतदेखील ४१० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver price Today)

Gold Silver Price
girls scheme: शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी खास योजना, महिन्याला मिळतात १००० रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती

चांदीच्या किंमती

आज ८ ग्रॅम चांदी ७६० रुपयांना विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९५० रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,५०० रुपये आहे. चांदीच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सोने-चांदीच्या किंमती एकसारख्या आहेत.

Gold Silver Price
PM Matru Vandana Scheme: गरोदर महिलांसाठी सरकारची खास योजना! मिळणार ६ हजार रुपयांची मदत; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com