दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण सोने-चांदी खरेदी करतात. सोने-चांदीच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहे.सोने-चांदीच्या वाढत्या किंमतींमुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.
सणासुदीच्या दिवसात सोने-खरेदी करणे शुभ मानले जाते. विशेषतः दिपावली पाडव्याला जास्त प्रमाणात सोने-खरेदी केले जाते. आज १ तोळा सोन्याची किंमत ७८,९९० रुपये आहे. सोन्याच्या किंमतीत अशीच वाढ झाली तर दिवाळीला खरेदीदारांच्या खिशाला फटका बसणार आहे.चला तर मग जाणून घेऊया सोने-चांदीचे भाव
२४ कॅरेट सोन्याच्या किंमती
आज २४ कॅरेट १ ग्रॅम सोने ७,८९९ रुपयांवर विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६३,१९२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७८,९९० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,८९,९०० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत
१ कॅरेट सोन्याची किंमत ७,२४१ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५७,९२८ रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ७२,४१० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,२४,१०० रुपये आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत
१ ग्रॅम सोन्याची किंमत ५,९२५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४७,४०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ५९,२५० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,९२,५०० रुपये आहे.
चांदीचे भाव
आज ८ ग्रॅम चांदी ७२९.८० रुपयांवर विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत ९९१ रुपये आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,९१० रुपये आहे. कालच्या तुलनेत आज सोने-चांदीच्या भावात फारसा बदल झालेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.