Gold Silver Price Today (21st October): सणासुदीत ग्राहकांना मोठा धक्का! सोन्याच्या दरात वाढ, चांदीही चकाकली; वाचा आजचे दर
Gold Silver Rate In Maharashtra (21st October):
लवकरच साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा दसरा हा सण भारतभर साजरा केला जाईल. या सणाच्या दिवशी अनेक ग्राहक सोन्याची खरेदी करतात. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते.
मागच्या चार महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली. या वर्षी फेब्रुवारी-एप्रिल महिन्यात धातुंनी रेकॉर्ड ब्रेक केले होते. मध्यंतरी सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु इस्त्राइल हमास युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. मागील दोन दिवसात सोन्या- चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती युद्धामुळे सोन्या (Gold)-चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली होती.
मागच्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात १२०० रुपयांनी वाढ झाली. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५६, ७५० रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ६१,९०० रुपये मोजावे लागणार आहे. १० ग्रॅमनुसार सोन्याचा भाव हा २१० रुपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या भावात किंचित वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम चांदीसाठी ७५३ रुपये मोजावे लागणार आहे.
दसरा दिवाळीच्या पूर्वी सोनं अधिक वाढू शकते. मुंबई-पुणे आणि नागपूरमध्ये आज सोन्याचा भाव २४ कॅरेटनुसार ६१,७५० रुपये आहे. तर नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव ६१,५६० रुपये आहे. तर ठाण्यातही भाव मुंबई (Mumbai)-पुण्यासारखाच आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.