Gold Silver Price Today (20th October): दसऱ्यापूर्वी सोनं ६१ हजारांवर, चांदीची चकाकी उतरली; तुमच्या शहरातील आजचा भाव किती?

Today's (20th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : पितृपक्षाच्या काळात सोन्याचे दर घसरले होते परंतु, दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
Gold Silver Price Today (20th October)
Gold Silver Price Today (20th October)Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (20th October) :

दसरा-दिवळीसारख्या सणांमध्ये अनेक ग्राहकांचा कल हा सोनं खरेदी करण्याकडे असतो. खरेदीच्या काळात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली आहे. पितृपक्षाच्या काळात सोन्याचे दर घसरले होते. परंतु, दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव वाढल्याने सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळणार का असा प्रश्न ज्वेलर्संना पडला आहे.

मागील दोन महिन्यांच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे. आज सोन्याच्या भावाने ६१ हजारांचा आकाडा मोडला आहे. दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या भावात वाढ झाल्याने दिवाळीत आणखी दर वाढू शकतात असे म्हटले जात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gold Silver Price Today (20th October)
Anti Aging Skin Care : वाढत्या वयात तरुण दिसायचंय? स्किन केअर रुटीनमध्ये या गोष्टींचा समावेश करा, दिसाल अधिक सुंदर

पितृपक्षाच्या काळात सोन्याचा भाव ५७ हजारांवर होता. मागील पंधरा दिवसात सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. आज २४ कॅरेटनुसार सोन्याचा भाव ७८० रुपयांनी (Price) वाढला आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबासाइटनुसार आज २२ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५६,५५० रुपये मोजावे लागणार आहे तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६१, ६९० रुपये प्रतितोळ्यासाठी मोजावे लागणार आहे. तर चांदीचा (Silver) दर प्रति किलोनुसार आज ७४,१०० रुपये आहे. चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Gold Silver Price Today (20th October)
Gold Silver Price Today (19th October): नवरात्रीत सोन्याला झळाळी, १ तोळं सोनं खरेदीसाठी किती पैसे द्यावे लागतील? मुंबई, ठाणे, पुण्यात किती?

तज्ज्ञांच्या मते, दिवाळी पूर्वी सोनं अधिक महागण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे-नागपूर या प्रमुख शहरात आज सोन्याच्या (Gold) भाव २४ कॅरेटसाठी ६१,५३० रुपये तर नाशिकमध्ये ६१,५६० रुपये आहे. नाशिकमध्ये भावात किंचित वाढ झाली आहे. तर ठाण्यातही भाव मुंबई-पुण्यासारखाच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com