सोन्या-चांदीच्या दरात सलग चौथ्य दिवशी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. मे-जून महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाव घसरल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आज सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव घसरले तर चांदीत किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली. तसेच डॉलरच्या किमतीतही घसरण झाल्याने सराफ बाजारात प्रभाव दिसून आला. १० ग्रॅमसाठी मुंबई-पुण्यातला आजचा भाव किती जाणून घ्या
1. आजचा सोन्याचा भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४०५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,९५० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,३८० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५८,६८० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच सोन्याच्या भावात २४ कॅरेटनुसार २७० रुपयांनी घसरण झाली आहे.
2. चांदीचा वाढलेला भाव
गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १० ग्रॅमसाठी ७३७ रुपयांनी घसरण झाली होती. तर आज १० ग्रॅमच्या भावासाठी ७४७ रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्या भावात आज प्रति किलोने १००० रुपयांनी वाढ झाली आहे.
3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 58,530 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 58,530 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 58,560 रुपये मोजावे लागणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.