Gold Silver Rate (12th December 2023)
Gold Silver Rate (12th December 2023)Saam Tv

Gold Silver Rate (12th December 2023): सोन्याच्या दरात घसरण, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचा भाव

Today's (12th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: मागच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने उसळी घेऊन १० ग्रॅमसाठी ६४००० रुपयांची विक्रमी पातळी ओलांडली होती. अशातच आठवड्याच्या अखेरीस हा भाव ६१,६०० रुपयांवर येऊन थांबला.
Published on

Gold Silver Rate In Maharashtra (12th December 2023):

शेअर बाजारात तेजीचे सत्र सुरु असताना सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळाली. दिवाळीच्या काळात सोन्याचा भाव नरमला होता त्यानंतर काही प्रमाणात सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उसळी घेतली.

मागच्या सहा महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. मागच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दराने उसळी घेऊन १० ग्रॅमसाठी ६४००० रुपयांची विक्रमी पातळी ओलांडली होती. अशातच आठवड्याच्या अखेरीस हा भाव ६१,६०० रुपयांवर येऊन थांबला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव नरमला आहे. एमसीएक्सवरील या किमतीनुसार सोन्याच्या (Gold) दरात मागील आठवड्यापासून २४०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. अशातच आज सोन्याच्या दरात २२० रुपयांनी घसरण झाली आहे.

Gold Silver Rate (12th December 2023)
Share Market Opening: शेअर बाजाराला 'अच्छे दिन'; निफ्टीची २०,००० पल्याड झेप, Sensex सलग दुसऱ्या दिवशी 'ऑल टाइम हाय'

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,२०६ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,०६० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,७०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६१,९१० रुपये

  • पुणे - ६१,९१० रुपये

  • नागपूर - ६१,९१० रुपये

  • नाशिक - ६१,९४० रुपये

  • ठाणे - ६१,९१० रुपये

  • अमरावती - ६१,९१० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com