Today's Gold Silver Rate : गुढीपाडव्यापूर्वी सोन्याची घौडदोड कायम, चांदीच्या किमतीही गगनाला; जाणून घ्या आजचा भाव

(8th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: सोने-चांदीच्या भावात मागच्या महिन्यापासून मोठी वाढ सुरु आहे. एमसीएक्सवर आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया.
Today's Gold Silver Rate, (8th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Today's Gold Silver Rate, (8th April 2024) Gold Silver Price In MaharashtraSaam Tv

24k Gold Silver Rate In Maharashtra:

गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या भावात भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. गुढीपाडवा आणि लग्नसराईचा काळ असल्यामुळे दागिन्यांना अधिक मागणी असते.

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. गुढीपाडव्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात वाढ सुरुच आहे. काल रविवारी सोने १५० रुपयांनी वधारुन ७१,२५० रुपये प्रति तोळा झाले. चांदीच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ती ८१,५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती.

सोने-चांदीच्या भावात मागच्या महिन्यापासून मोठी वाढ सुरु आहे. एमसीएक्सवर आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया.

Today's Gold Silver Rate, (8th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : गुढीपाडवा! या आठवड्यात ६ राशींना होणार अचानक धनलाभ, वाचा एका क्लिकर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,५८० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७१,७७० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ३३० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८४,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

Today's Gold Silver Rate, (8th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Petrol Diesel Rate (8th April 2024): पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील नवे दर

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ७१,६२० रुपये

  • पुणे - ७१,६२० रुपये

  • नागपूर - ७१,६२० रुपये

  • नाशिक - ७१,६५० रुपये

  • ठाणे - ७१,६२० रुपये

  • अमरावती - ७१,६२० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com