Petrol Diesel Rate (8th April 2024): पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल, जाणून घ्या महाराष्ट्रातील नवे दर

Petrol Diesel Price Today 8th April 2024 : मागच्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होताना दिसून येत आहे. कच्चे तेल प्रति बॅरल ८० वर विकले जात होते परंतु यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कच्चे तेल आज ९० डॉलरवर विकले जात आहे.
Petrol Diesel Rate (8th April 2024), Petrol Diesel Price Today 8th April 2024
Petrol Diesel Rate (8th April 2024), Petrol Diesel Price Today 8th April 2024Saam Tv

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती अपडेट करत असतात. त्यात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे.

मागच्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होताना दिसून येत आहे. कच्चे तेल प्रति बॅरल ८० वर विकले जात होते परंतु यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कच्चे तेल आज ९० डॉलरवर विकले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $89.00 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $84.94 वर व्यापार करत आहे. जाणून घेऊया पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती

Petrol Diesel Rate (8th April 2024), Petrol Diesel Price Today 8th April 2024
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : गुढीपाडवा! या आठवड्यात ६ राशींना होणार अचानक धनलाभ, वाचा एका क्लिकर

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.१५ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी आहे.

Petrol Diesel Rate (8th April 2024), Petrol Diesel Price Today 8th April 2024
UPI वरुन करता येणार Cash Deposit, RBI चा पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.१५ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती १०३.७६ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.२९ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.४३ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०.९५ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.०६ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.६२ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६.६२ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.३९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com