Today's Gold Silver Rate : गुढीपाडव्यापूर्वीच सोनं ७० हजारांच्या पल्ल्याड, चांदीनंही भाव खाल्ला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

(6th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने गुरुवारी सर्वकालिन उच्चांक पातळी गाठली होती. अशातच धातुच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे.
Today's Gold Silver Rate, (6th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Today's Gold Silver Rate, (6th April 2024) Gold Silver Price In MaharashtraSaam Tv

24k Gold Silver Rate In Maharashtra:

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने गुरुवारी सर्वकालिन उच्चांक पातळी गाठली होती. अशातच धातुच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे. अवघ्या दोन दिवसात गुढीपाडव्याचा सण येणार आहे. त्यानंतर लग्नसराईचा काळ सुरु होईल.

गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ७० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च महिन्याप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली आहे. मागच्या चार दिवसात सोन्याच्या भावात २३०० रुपयांनी तर चांदीच्या दरात ४००० रुपयांनी वाढ झाली.

लग्नसराईच्या काळात दागिन्यांना अधिक मागणी असते. अशातच एमसीएक्सवर आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांक पातळी गाठली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया

Today's Gold Silver Rate, (6th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Gold Rate Hike 2024 : गुढीपाडव्यापूर्वीच सोनं ७२ हजारांवर? खरेदीसाठी मागणीत वाढ सुरुच; कारण काय?

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,५५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७१,४४० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात १,३१० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८३,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Today's Gold Silver Rate, (6th April 2024) Gold Silver Price In Maharashtra
Petrol Diesel Rate (6th April 2024): वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ७१,२९० रुपये

  • पुणे - ७१,२९० रुपये

  • नागपूर - ७१,२९० रुपये

  • नाशिक - ७१,३२० रुपये

  • ठाणे - ७१,२९० रुपये

  • अमरावती - ७१,२९० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com