Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! प्रति तोळ्यामागे तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Gold Rate Today Hike: सोन्याच्या दरात आज पन्हा वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आता पुन्हा सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर पुन्हा वाढले

प्रति तोळ्यामागे १३१० रुपयांनी वाढ

सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना फटका

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून बदल होत आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. परंतु आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १३१० रुपयांनी वाढले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: सोन्याला चकाकी! सोन्याचे दर १०००० रुपयांनी वाढले; सुवर्णनगरीतील 22K आणि 24K चे आजचे दर किती?

इराण-अमेरिकेतील युद्धाचा परिणाम सोन्याच्या दरावर होताना दिसत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी सोन्याचे दर घसरत असल्याचे दिसत होते. त्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १३१० रुपयांनी महागले असून हे दर १,५८,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १०४८ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२६,६८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १३,१०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १५,८३,५०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22K Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर १२०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४५,१५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ९६० रुपयांनी महागले असून हे भाव १,१६,१२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १२ हजारांची वाढ होऊन हे दर १४,५१,५०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे तब्बल ९८०० रुपयांची घसरण; वाचा आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

१८ कॅरेट सोन्याचे दर ९८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१८,७६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८४ रुपयांनी वाढले असून हे दर ९५,००८ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोनं ९,८०० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ११,८७,६०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today: पेट्रोल वाढलं, सोन्याचे काय झालं? वाचा 22k, 24k सोन्याचे ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com