आज १ ऑक्टोबर २०२६ रोजी सोन्याच्या दरात घसरण
महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदी झाली स्वस्त
२४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ३३०० रुपयांची घसरण
१ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली
सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ- उतार सुरू आहे. पितृपक्षात सोन्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. आज ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे आज ग्राहकांना सोन्यासोबत चांदी खरेदीची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३३० रुपयांनी घसरण झाली. तर १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाण्याचा प्लान करत असाल तर १८-२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ३३० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,४९,२४० रुपये खर्च करावे लागतील. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,३०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १४,९२,४०० रुपये खर्च करावे लागतील.
२२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं ३०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३६,८०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३,००० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,६८,००० रुपये खर्च करावे लागतील. सोन्याचे दागिने २२ कॅरेटचे बनवले जातात. त्यामुळे आज तुम्ही २२ कॅरेटच्या सोन्याचे दागिने खरेदी करू शकता.
२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २५० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,११,९३० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २,५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,१९,३०० रुपये खर्च करावे लागतील.
दरम्यान, आज सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरामध्ये ५ रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना २३५ रुपये खर्च करावे लागतील. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी ग्राहकांना २,३५,००० रुपये खर्च करावी लागतील. आज ग्राहकांना सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.